मुलीच्या लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या महिलेची पर्समधून ४२ हजार लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:17 IST2021-01-03T04:17:14+5:302021-01-03T04:17:14+5:30

जळगाव : फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या मंगलाबाई पाटील (५५, रा.खोटे नगर) यांच्या पर्समधून ४२ हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची ...

He took Rs 42,000 from the purse of a woman who came to buy a girl's wedding | मुलीच्या लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या महिलेची पर्समधून ४२ हजार लांबविले

मुलीच्या लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या महिलेची पर्समधून ४२ हजार लांबविले

जळगाव : फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या मंगलाबाई पाटील (५५, रा.खोटे नगर) यांच्या पर्समधून ४२ हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मंगला पाटील यांच्या मुलीचे काही दिवसात लग्न आहे. त्यासाठी त्या नातलगांसह शनिवारी दुपारी फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या होत्या. पर्समध्ये त्यांच्याकडे ५० हजार रुपये होता. एका दुकानातून त्यांनी आठ हजार रुपयांच्या साड्या घेतल्या. सोबतच्या दोन तरुणी इतर ठिकाणी नातेवाईकांच्या भेटीला गेल्या तर मंगला पाटील या दुसऱ्या दुकानात जात असताना त्याचवेळी पर्समधून ४२ हजार रुपये लांबविण्यात आले. गर्दीत धक्का लागल्याने पर्स खाली पडली. ती उचलून तपासली असता त्यातील ४२ हजार रुपये गायब झाले होते. दरम्यान, शहर पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र संशयास्पद काहीच मिळाले नाही.

Web Title: He took Rs 42,000 from the purse of a woman who came to buy a girl's wedding