शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुझे हक है... म्हणत त्याने जपला भावबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 21:36 IST

अजब आणि अनोख्या प्रेमाच्या या कहाणीला कासोद्यात लग्नाच्या निमित्ताने मूर्त स्वरूप आले त्यावेळी अनेकांच्या डोळ्याच्या कळा अश्रूंनी पाणावल्या.

ठळक मुद्देकॅन्सर पीडित गुलनाज सोबत तौसीमचा निकाह कासोद्यातील तरुणाने घालून दिला आदर्श

प्रमोद पाटील कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : दोन वर्षांपूर्वी झालेली लग्नाची बोलणी अन् त्यानंतर उपवर तरुणीला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराची लागण. हाडाच्या कॅन्सरने अकाली आलेल्या अपंगत्वामुळे तरुणीचे भावी आयुष्याचे स्वप्न उद्ध्वस्त होते की काय? अशी भीती व्यक्त होत असताना उपवर मुलाने पुढाकार घेत कॅन्सरपीडित तरुणीसोबत निकाह करीत नात्यातील भावबंध जोपासला. अजब आणि अनोख्या प्रेमाच्या या कहाणीला कासोद्यात लग्नाच्या निमित्ताने मूर्त स्वरूप आले त्यावेळी अनेकांच्या डोळ्याच्या कळा अश्रूंनी पाणावल्या.अडीच वर्षांपूूर्वी कासोदा येथील ए.टी.टी. हायस्कूलमागील इंदिरा नगर येथील रहिवासी तौसीमखान याचा आपल्या मामाची मुलगी गुलनाज खानसोबत विवाह निश्चित झाला होता. त्यानंतर लग्न फेब्रुवारी २०२० मध्ये होणार होते. तौसीम आणि गुजनाज भावी आयुष्याचे स्वप्न रंगवित असताना २०१९ मध्ये गुलनाजच्या डाव्या बाजूच्या दंडात वेदना सुरु झाल्या. कुटुंबियांनी गावातील दवाखान्यातील उपचारानंतर डॉक्टरांनी मुंबईत रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. याठिकाणी डॉक्टरांनी हाडाच्या कॅन्सरचे निदान केले. जेमतेम परिस्थिती असताना आईवडिलांनी मुलीची शस्त्रक्रिया करीत तिच्या वेदनेवर फुंकर घातली. शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या हाडातील दुखणे पूर्णपणे गेले होते. मात्र संकटे पिच्छा सोडण्याचे नाव घेत नव्हते. सहा महिन्यांनंतर गुलनाजच्या पाठीच्या मणक्यात त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी हाडाच्या कॅन्सरचे निदान केल्यानंतर आता हे दुखणे बरं होणे शक्य नाही, असेही सांगितले. अकाली दुख:मुळे नवरी मुलीला दु:खाने काळाच्या ओघात ओढले होते. यासाऱ्यात आजारपणाने तिचे दोन्ही पाय निकामी झाले. दुसºयाच्या मदतीशिवाय ती जागेवरून सरकू शकत नाही. लग्नाची तारीख जवळ आल्याने आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजार असल्याने सर्वच जण विवाहाबाबत साशंक होते. त्यातच उपवर तरुण तौसिफ याने गुलनाज हिच्यासोबत विवाहासाठी ठाम असल्याचे सांगितले. त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी मुस्लीम धर्मातील रितीरिवाजाप्रमाणे विवाह पार पडला. यावेळी मुलाच्या धैर्याचे व अतुट प्रेमामुळे सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले होते. हे लग्न पहाण्यासाठी हिंदू मुस्लिमांसह लहान, थोर, महिला यांच्यासह सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी गावात याच लग्नाची सर्वत्र चर्चा होत होती. दि.१४ चा खºया प्रेमाचा व्हॅलेंटाईन 'डे' आज येथे सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने साजरा झाला.गुलनाजला लग्नानंतर कॅन्सर झाला असता तर सोडले नसते. तर आता का म्हणून तिला अंतर देऊ. आमचे लग्न जुळले होते. एकमेकांसोबत विवाह व्हावा ही आमच्या दोघांची इच्छा होती. त्यानुसार आम्ही विवाह केला.: नवरदेव तौसीम खान, कासोदा.

टॅग्स :SocialसामाजिकErandolएरंडोल