जलक्रांतीचे श्रेय स्वत: न घेता सर्व संत महंतांना दिले : सुरेशशास्त्री मानेकर बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 03:53 PM2020-07-22T15:53:00+5:302020-07-22T15:55:01+5:30

९ मिनिटांचा माहितीपट महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आश्रम वढोदा येथे एका छोटेखानी कार्यक्रमात हरिभाऊंच्या पवित्र स्मृतीस समर्पित करण्यात आला.

He gave the credit of water revolution to all saints and mahants without taking it himself: Suresh Shastri Manekar Baba | जलक्रांतीचे श्रेय स्वत: न घेता सर्व संत महंतांना दिले : सुरेशशास्त्री मानेकर बाबा

जलक्रांतीचे श्रेय स्वत: न घेता सर्व संत महंतांना दिले : सुरेशशास्त्री मानेकर बाबा

Next
ठळक मुद्देहरिभाऊ जावळे विचार मंचतर्फे माहितीपटाचे विमोचन माहितीपट महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आश्रम वढोदा येथे एका छोटेखानी कार्यक्रमात हरिभाऊंच्या पवित्र स्मृतीस समर्पित

फैजपूर : कृषीमित्र स्व.हरिभाऊ जावळे विचार मंचच्या माध्यमातून स्व.हरिभाऊंंच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी तयार करण्यात आलेला ९ मिनिटांचा माहितीपट महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आश्रम वढोदा येथे एका छोटेखानी कार्यक्रमात हरिभाऊंच्या पवित्र स्मृतीस समर्पित करण्यात आला.
कोरोनामुळे कार्यक्रम अल्प उपस्थितीत घेऊन फेसबुकवर लाइव्ह करण्यात आला होता. १००० लोक या कार्यक्रमाला जोडले गेले होते.
या प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हतिजी महाराज, सुरेशशास्त्री मानेकर बाबा, भक्तीकिशोरदासजी शास्त्री आणि अमोल जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी भक्तिकिशोरदास शास्त्रीजी यांनी स्वरचित श्लोकात्मक स्मरण म्हणून एक प्रतिमा अमोल जावळे यांना सप्रेम भेट दिली. कृषीमित्र हरिभाऊ जावळे विचार मंचच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या माहितीपटाची संकल्पना हरिभाऊंचे जनसंपर्क अधिकारी आणि अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांची आहे.
मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी, तर श्लोकाचे वाचन ज्ञानेश्वर घुले यांनी केले. आभार मयूर कोल्हे यांनी मानले. याप्रसंगी नारायण चौधरी, ललित बोंडे, पराग पाटील, चेतन चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: He gave the credit of water revolution to all saints and mahants without taking it himself: Suresh Shastri Manekar Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.