भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घरात घुसून गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:34+5:302021-09-24T04:18:34+5:30

जळगाव : भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आकाश मुरलीधर सपकाळे याच्या घरात घुसून गोळीबार केल्याची थरारक घटना गुरुवारी (दि. २३) ...

He broke into the house and shot to avenge his brother's murder | भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घरात घुसून गोळीबार

भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घरात घुसून गोळीबार

जळगाव : भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आकाश मुरलीधर सपकाळे याच्या घरात घुसून गोळीबार केल्याची थरारक घटना गुरुवारी (दि. २३) सकाळी साडेआठ वाजता कांचन नगरात घडली. या घटनेत झालेल्या झटापटीत मयूर ऊर्फ विक्की दीपक अलोने हा पळून जात असताना जमिनीवर कोसळला, त्यात डोक्याला मार लागल्याने तो जागेवरच बेशुद्ध पडला, तर अन्य तीन जण फरार होण्यात यशस्वी झाले. मात्र काही वेळातच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेत संशयितांमध्ये माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा बाबू, प्रद्युग्न ऊर्फ बंटी नंदू महाले, विक्की अलोने, मिलिंद सकट व राहुल भालेराव अशा पाच जणांची नावे पुढे आली आहेत. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले.

पहाटे ३ वाजता फोन; पत्नीचा विरोध

माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा बाबू याने पहाटे ३ वाजता विक्की अलोने याला फोन केला. तू तयार राहा, आपल्याला आकाशचा गेम वाजवायचा आहे, असे सांगितले. प्लॅन समजून घेतल्यानंतर विक्की याने हो म्हटल्यावर फोन ठेवला. त्यानंतर पत्नीने विक्कीला विचारणा केली. तुम्ही कुठेच घराबाहेर जायचे नाही असे तिने सांगितले, मात्र तरीदेखील विक्की घराबाहेर गेलाच, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.

काय म्हणाला विक्की

विक्की याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. घटनेबाबत त्याला बोलते केले असता आम्ही तीन जण रिक्षा पकडून कांचन नगरात आलो. मिलिंद सकट व बंटी घरात गेले तर मी बाहेर होतो. आतमध्ये काय झाले माहिती नाही; पण थोड्याच वेळात दोघं जण बाहेर धावत आले. मीदेखील पळत असताना मला पाच-सहा जणांनी पकडले. बेदम मारहाण केली. यात एका जणाने डोक्यात चाकू खुपसला तर काही जणांनी पायावर दगड मारले. त्यानंतर मी बेशुद्ध पडलो. पुढे काय झालं माहिती नाही, असे विक्की याने लोकमतला सांगितले.

काय म्हणाला आकाश

या घटनेबाबत आकाश सपकाळे याला विचारणा केली असता भाऊ नितीन व वडील मुरलीधर नथ्थू सपकाळे घरात एका बेडवर तर मी दुसऱ्या बेडवर झोपलो होता. नितीनची पत्नी कोमल किचनमध्ये होती. आई रंजना शेतात गेली होती. अचानक चार जण घराजवळ आले. त्यातील मिलिंद सकट व बंटी महाले याने गोळीबार करायला सुरुवात करताच भाऊ नितीन याने त्याला पकडले. त्यात एक गोळी सुटली व माझ्या करंगळीला लागली. यावेळी झटापट झाली. संबंधितांनी चार राऊंड फायर केले. हा प्रकार पाहून कोमल हिने आरडाओरड केली. घरात व बाहेर एकूण आठ काडतूस पडलेले होते तर दोन पिस्तूलचा यात वापर झाल्याचे आकाश याचे म्हणणे आहे.

Web Title: He broke into the house and shot to avenge his brother's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.