बंद घर फोडून ३५ हजारांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:39 IST2021-01-13T04:39:01+5:302021-01-13T04:39:01+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पाटील (३२) हे खासगी कंपनीत नोकरीला असून, कोल्हे हिल्स परिसरातील माउलीनगरात पत्नी सोनाली व ...

He broke into a closed house and stole Rs 35,000 | बंद घर फोडून ३५ हजारांचा ऐवज लांबविला

बंद घर फोडून ३५ हजारांचा ऐवज लांबविला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पाटील (३२) हे खासगी कंपनीत नोकरीला असून, कोल्हे हिल्स परिसरातील माउलीनगरात पत्नी सोनाली व मुलगी युक्ता यांच्यासह वास्तव्याला आहेत. ७ जानेवारी ते घराला कुलूप लावून पत्नी व मुलीसह दोंडाईचा येथे गेले होते. सोमवारी रात्री घरी परतले असता, दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला होता, तर घरातील कपाटही उघडे होते. घरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर, रोख रक्कम व दागिने तपासले असता, ते गायब झालेले होते. चोरट्यांनी १२ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ३ हजार रुपये किमतीची मुलीची सोन्याची अंगठी, १० हजार रुपये रोख व ५ हजार रुपये किमतीच्या लहान मुलांच्या सोन्याच्या कड्या असा ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे उघड झाले. पाटील यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ठसे तज्ज्ञांनी ठशांचे नमुने घेतले. तपास सतीश हळणोर करीत आहेत.

Web Title: He broke into a closed house and stole Rs 35,000