आरोप-प्रत्यारोप थांबवून जळगावकरांवर दया करा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST2021-05-05T04:27:04+5:302021-05-05T04:27:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून जळगावकर समस्यांनी त्रस्त झाले आहे. आमच्या व तुमच्या आरोपांना जळगावर कंटाळले ...

आरोप-प्रत्यारोप थांबवून जळगावकरांवर दया करा?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून जळगावकर समस्यांनी त्रस्त झाले आहे. आमच्या व तुमच्या आरोपांना जळगावर कंटाळले आहेत. त्यामुळे आता तरी विकासकामे होवून द्या, आरोप प्रत्यारोप थांबवून आता तरी जळगावकरांवर दया करा असा सल्ला शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांना दिला.
महापालिकेच्या विरोधीपक्षनेते यांच्या दालनात झालेल्या या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे व उपगटनेते प्रशांत नाईक उपस्थित होते. सोमवारी भाजपा पदाधिकऱ्यांनी पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठका घेण्याशिवाय काहीच काम करीत नसल्याचा आरोप केला होता. या आरोपांचा भाजप पदाधिकाऱ्यांनी समाचार घेतला.
भाजपाच्या महानगराध्यांसह पदाधिकाऱ्यांनी आपली कुवत पाहूनच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप करावे अशा शब्दात शिवसेनेच्या महापालिका पदाधिकाऱ्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. गिरीश महाजन पालकमंत्री असताना जळगाव महापालिका कर्जमुक्त केल्याचे सांगून भाजप जनतेची दिशाभूल करीत असल्याचा असल्याचा आरोप देखील यावेळी केला आहे.
शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट केला. मोहाडी महिला रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी ३०० बेडची व्यवस्था केली. जळगाव महापालिकेला ६१ कोटींचा निधी दिला. या कामांची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. भाजपाकडून वारंवार जळगाव महापालिका भाजप नेते गिरीश महाजन यांनी पालकमंत्री असतांना कर्जमुक्त केल्याचे सांगीतले जात आहे. मात्र, भाजपाने हुडको कर्जाबाबत केलेली सेटेलमेंट नुकसान सोसून केली आहे. तसेच राज्य शासनाने त्यावेळी महापालिकेवर पुन्हा १२५ कोटीचा भार टाकल्याने ते पैसे अद्याप मनपा दरमहा ३ कोटी प्रमाणे भरत आहे. त्यामुळे ही कर्जमुक्ती केवळ दिशाभूल असल्याची टीका शिवसेनेचे गटनेते जोशी यांनी केली. भाजपाच्या महापौरांनी ठराव केल्यामुळेच सेनेचे पालकमंत्री पाटील यांच्याकडून ६१ कोटींची निधी मिळाला असे म्हणणे हे भाजप पदाधिकाऱ्यांचे अज्ञान असल्याचेही अनंत जोशी यांनी सांगीतले.