आशादीपमध्ये असा प्रकार घडलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:16 AM2021-03-05T04:16:05+5:302021-03-05T04:16:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आशादीप वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावल्याच्या प्रकार कधीही घडला नाही. तेथे मुलींच्या ...

This has never happened in Ashadeep | आशादीपमध्ये असा प्रकार घडलाच नाही

आशादीपमध्ये असा प्रकार घडलाच नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आशादीप वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावल्याच्या प्रकार कधीही घडला नाही. तेथे मुलींच्या नातेवाइकांना देखील मध्ये दिले जात नाही. मलादेखील तेथे फक्त मुलीला नेण्याच्या वेळी एकदाच प्रवेश दिला होता. त्यामुळे तेथे इतरांना प्रवेश दिला जात नाही. मुलीला देखील या प्रकाराबाबत विचारले त्यावेळी तिने तेथे एकदाही असा प्रकार घडलेला नाही. संबंधित मुलगी ही वेडसर असल्याची माहिती या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या मुलीच्या आईने आणि भावाने ‘लोकमत’ला दिली.

जळगावच्या आशादीप वसतिगृहात मंगळवारी एका महिलेने येथे कपडे काढून नाचवले असल्याची तक्रार आतमधूनच ओरडून केली होती. त्यावेळी तेथे आलेल्या समतानगरमधील एका मुलीच्या भावाने आणि त्याच्या मित्राने या प्रकाराचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ पाहून सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर राज्यभर वादळ उठले. या प्रकरणात समतानगरमधील एक मुलगी ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. कारण त्यावेळी तिला न्यायला तिची आई आणि भाऊ तेथे गेले होते. मुलगी आई-वडिलांसोबत निघून गेल्यानंतर संबंधित महिलेचा ओरडतानाचा व्हिडिओ काढला.

याबाबत समतानगरातील तरुणीच्या आईने ‘लोकमत’ला सांगितले की, वसतिगृहात मी दररोज मुलीची समजूत काढायला जात होते. तेथे फक्त समुपदेशक म्हणून येत असलेल्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांनाच प्रवेश दिला गेला. जेव्हा मुलीने माझ्यासोबत येण्याची तयारी दाखवली तेव्हाच मला प्रवेश दिला गेला होता. मुलीला तेथे आलेल्या अडचणींबाबत विचारणा केली तर तिने फक्त जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती दिली होती. त्यांनी तेथे कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचे सांगितले. तसेच जी महिला तक्रार करत होती. त्या महिलेनेच मुलीला अनेकवेळा त्रास दिला होता. ती मुलीला नीट झोपू देत नव्हती. तसेच तेथे असलेल्या ज्या महिला गर्भवती आहेत. त्यांनाही ती महिला त्रास देत होती.’

या वसतिगृहात नाचगाणे झाले होते का, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘मुलीला शनिवार ते मंगळवार तेथे ठेवण्यात आले होते. मात्र या दिवसात एकदाही तेथे असे कार्यक्रम झाले नाही.’

Web Title: This has never happened in Ashadeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.