खडसे घराणे हे जन्मापासूनच सहकार शिकून आले आहेत का- चंद्रकांत पाटील यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 21:57 IST2020-01-12T21:56:40+5:302020-01-12T21:57:44+5:30
ज्यांना तीस वर्षात जनता समजली नाही त्यांना कीतीही जन्म घेतले तरी चंद्रकांत पाटील समजणार नाही.

खडसे घराणे हे जन्मापासूनच सहकार शिकून आले आहेत का- चंद्रकांत पाटील यांचा टोला
बोदवड (जि. जळगाव) : चंद्रकांत पाटलांना सहकार समजण्यासाठी दोन जन्म घ्यावे लागतील, या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विधानाचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज समाचार घेतला.
नाडगाव येथील सत्कार समारंभात ते म्हणाले की, मी ३० वर्षापासून राजकारणात सक्रीय असताना माझ्या सारख्यास सहकार समजत नसेल तर खडसे यांचे घराणे हे जन्मापासून सहकार शिकून आले आहे का? असा टोला आमदार पाटील यांनी लगावला. याचबरोबर ते म्हणाले की, ज्यांनी नेहमी घराणेशाही केली व ज्यांना तीस वर्षात जनता समजली नाही त्यांना कीतीही जन्म घेतले तरी चंद्रकांत पाटील समजणार नाही.