हरिभाऊ हे जनतेतून तयार झालेलं नेतृत्व होतं -देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 22:39 IST2020-07-08T22:38:02+5:302020-07-08T22:39:23+5:30

भालोद येथे बुधवारी रात्री ९ वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते.

Haribhau was a leadership formed by the people - Devendra Fadnavis | हरिभाऊ हे जनतेतून तयार झालेलं नेतृत्व होतं -देवेंद्र फडणवीस

हरिभाऊ हे जनतेतून तयार झालेलं नेतृत्व होतं -देवेंद्र फडणवीस

ठळक मुद्देमाजी दिवंगत खासदार हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांची घेतली भेटभालोद येथे भेट, कुटुंबियांचे केले सांत्वन

फैजपूर/भालोद, जि.जळगाव : स्व.हरिभाऊ हे जनतेतून तयार झालेलं नेतृत्व होतं व ते हाडाचे शेतकरी होते. काळ्या मातीशी त्यांचं नातं घट्ट होतं,.शेतीतील कृतिशील प्रयोग, कृषी संशोधनाच्या माध्यमातून केळीच्या संदर्भातील त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग अत्यंत महत्वाचे होते. शेती व शेतकऱ्यांची जाण असलेला नेता आज आपल्यात नाही यावर अद्यापही विश्वास बसत नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी केल. बुधवारी रात्री ते माजी खासदार स्व.हरिभाऊ जावळे यांच्या निधना पश्चात त्यांच्या कुटुंबाच्या भेटीकरीता ते भालोद, ता.यावल येथे आले असता बोलत होते.
भालोद येथे बुधवारी रात्री ९ वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते. सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी आदींची उपस्थिती होती.
स्व. हरिभाऊ जावळे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची सर्व मान्यवरांनी भेट घेतली. यावेळी त्यांचे चिरंजीव अमोल जावळे यांच्यासह कुटुंबियांची त्यांनी पाऊण तास चर्चा केली. तसेच स्व.हरिभाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना याठिकाणी सर्व मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर भालोद गावात येत असल्याने अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गावात उपस्थित दिली होती तर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर यांची उपस्थिती होती. यानिमित्त गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Haribhau was a leadership formed by the people - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.