मतदार संघातील तरूण शेतकऱ्यांच्या संशोधनाला वाव मिळवून देऊ-हरिभाऊ जावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 05:18 PM2019-07-27T17:18:45+5:302019-07-27T17:20:18+5:30

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच रावेर-यावल तालुक्यातील तरुण शेतकºयांच्या प्रयोगशिलतेला वाव व विद्यापीठातील संशोधन शेतकºयांच्या बांधापर्र्यंत पोहोचवण्याचा अर्थात 'लॅब टू लॅड' प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा प्राप्त असलेले असलेले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार हरिभाऊ जावळे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

Haribhau Jawale will get the opportunity to research young farmers in the constituency | मतदार संघातील तरूण शेतकऱ्यांच्या संशोधनाला वाव मिळवून देऊ-हरिभाऊ जावळे

मतदार संघातील तरूण शेतकऱ्यांच्या संशोधनाला वाव मिळवून देऊ-हरिभाऊ जावळे

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे विशेष मुलाखतमहाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांची ग्वाही

वासुदेव सरोदे
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच रावेर-यावल तालुक्यातील तरुण शेतकºयांच्या प्रयोगशिलतेला वाव व विद्यापीठातील संशोधन शेतकºयांच्या बांधापर्र्यंत पोहोचवण्याचा अर्थात 'लॅब टू लॅड' प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा प्राप्त असलेले असलेले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार हरिभाऊ जावळे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.
खºया अर्थाने कृषी व भूमिपुत्र असलेले आमदार हरिभाऊ जावळे यांचा शेती हा आवडीचा विषय आहे व त्यासाठीच ते सतत शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात व त्यांच्या प्रयत्नाने पिंपरूळ, ता.यावल येथे ताप्ती बनाना एनर्जी हा केळी खोडापासून विविध उत्पादन प्रक्रिया उद्योग उभा राहिलेला आहे.
आमदार जावळे उपाध्यक्ष झालेल्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. त्यात राहुरी, परभणी, अकोला व दापोली कोकण येथील कृषि विद्यापीठांचा समावेश आहे. या चारही विद्यापीठांमध्ये प्रभावी समन्वय व सुसूत्रता साधण्यासाठी १० सप्टेंबर १९८४ मध्ये या परिषदेची स्थापना झाली आहे. या परिषदेमार्फत कृषी विद्यापीठांचा आढावा घेणे, त्यांचे मूल्यमापन व पर्यवेक्षण करणे व मार्गदर्शनाची जबाबदारी पार पाडणे आहे, शिक्षण, संशोधन व शिक्षण विस्तार हे तीन मुख्य विभाग करण्यात आले असून, धोरणात्मक निर्णय या परिषदेमार्फत घेतले जातात.
आमदार जावळे यांची या परिषदेवर तीन वर्षांसाठी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. पण आगामी काळात निवडणुका असल्याने वेळ कमी असल्याने या संधीचे सोने शेतकºयांच्या हितासाठी करणे आहे ब
आमदार जावळे यांची भेट घेऊन त्यांचा आगामी काळात काय अजेंडा असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले की, या कृषी विद्यापीठांमध्ये सतत नवनवीन संशोधन होत असते. ते संशोधन शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहोचवून त्याचा फायदा शेतकरी बांधवांना करून देणे अर्थात 'लॅब टू लँड' संकल्पना राबविणे याला प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे रावेर, यावल तालुका व परिसरातील तरुण शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असतात. त्यांचे प्रयोग विद्यापीठापर्यंत पोहोचवणे त्यात अधिकची सुधारणा करणे व त्यांना शासकीय मान्यता मिळवून देत या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
मतदारसंघात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून हिंगोणा येथे हळद संशोधन केंद्राला ६० एकर जागा मिळालेली आहे. त्या जागेवर हळद संशोधन केंद्र उभारणे तसेच जमिनीखालील पिकांचे संशोधन व उत्पादन वाढीसाठी प्रयत्न या केंद्रामार्फत राहणार आहे. तसेच पाल येथे हार्टिकल कॉलेज मंजूर आहे, त्याची उभारणी करणे व त्यासाठी आगामी काळात प्रयत्न राहणार आहे. याप्रसंगी मुलाखतीचा शेवट करताना आमदार जावळे यांनी सर्वात मुख्य व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेला प्रोजेक्ट शेतकºयांचे उत्पन्न कमी खर्चात दुप्पट करणे तसेच उत्कृष्ट प्रतीचे उत्पादन त्यातून काढणे यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Haribhau Jawale will get the opportunity to research young farmers in the constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.