अश्लील फोटो पाठवून भाजीपाला विक्रेत्या महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST2021-08-21T04:20:26+5:302021-08-21T04:20:26+5:30
जळगाव : व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो पाठवून भाजीपाला विक्रेत्या महिलेचा विनयंभग केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अश्लील फोटो पाठवून भाजीपाला विक्रेत्या महिलेचा विनयभंग
जळगाव : व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो पाठवून भाजीपाला विक्रेत्या महिलेचा विनयंभग केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी भाजीपाला विक्रेत्या महिलेच्या व्हॉट्सॲपवर १५ ते १८ ऑगस्टच्या दरम्यानात अज्ञात मोबाइल क्रमांकावरून कुणीतरी अश्लील फोटो पाठविले. हा प्रकार महिलेने गुरुवारी शनिपेठ पोलिसांना सांगितल्यानंतर तक्रार दाखल केली. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
००००००००००००
बोहरा गल्लीतून दुचाकी लंपास
जळगाव : इंद्रप्रस्थ नगरातील योगेश बाबुराव पाटील यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने बोहरा गल्लीतून चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
१७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता बोहरा गल्लीतील रघुनंदन ट्रेडिंग दुकानाजवळील बोळीत योगेश पाटील यांनी त्यांची दुचाकी (एमएच.१९.एएम.१३१८) सकाळी उभी केली होती. काम आटोपून दुपारी ३ वाजता ते दुचाकी उभ्या केलेल्या ठिकाणी आले असता, त्यांना दुचाकी चोरीला गेल्याची दिसून आली. त्यानंतर, गुरुवारी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.