माहेरून पैसे न दिल्याने विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:49+5:302021-07-22T04:12:49+5:30
प्रियंका गणेश सोलंकी (कोळी गल्ली, पारोळा) हिने पारोळा पोलिसात फिर्याद दिली की, माझे पती गणेश सुदाम सोलंकी, सुदाम महादू ...

माहेरून पैसे न दिल्याने विवाहितेचा छळ
प्रियंका गणेश सोलंकी (कोळी गल्ली, पारोळा) हिने पारोळा पोलिसात फिर्याद दिली की, माझे पती गणेश सुदाम सोलंकी, सुदाम महादू सोलंकी, उषा सुदाम सोलंकी (सुरत), पूजा सतीश ठाकूर, सतीश शिवाजी ठाकूर (नवसारी) या सर्वांनी माझ्या लग्नानंतर दोन ते अडीच महिन्यानंतरच आम्हाला सुरत येथे नवीन घर घ्यायचे आहे. त्यासाठी तू माहेरून तीन लाख रुपये आण, असे सांगितले.
माझे पती यांनी सांगितले की, तू मला आवडत नाही. माझे दुसरीशी प्रेमसंबंध आहे. तिच्याशी लग्न करायचे आहे. मी माहेरून पैसे आणण्यास नकार दिला दिला म्हणून माझे पती व सासू, सासरे, नणंद यांनी माझा मानसिक शारीरिक छळ करत मारहाण केली. याप्रकरणी आज पारोळा पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.