सुटकेस भरून पैशांसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:18 IST2021-09-11T04:18:08+5:302021-09-11T04:18:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : माहेरून सुटकेस भरून पैसे आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक-शारीरिक छळ केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात ...

Harassment of a married woman for money by filling a suitcase | सुटकेस भरून पैशांसाठी विवाहितेचा छळ

सुटकेस भरून पैशांसाठी विवाहितेचा छळ

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : माहेरून सुटकेस भरून पैसे आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक-शारीरिक छळ केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमा यांचा गुरुनानक नगरातील प्रवीण सुनील शिंदे यांच्याशी दहा ते बारा वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर सासरच्यांकडून सीमा यांचा शारीरिक-मानसिक छळ सुरू झाला. नंतर सासूच्या सांगण्यावरून पती प्रवीण शिंदे यांनी पत्नीस मारहाण करण्यास सुरूवात केली. माहेरहून सुटकेस भरून पैसे घेऊन ये, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सासरच्यांकडून मिळत होती. तर सासरे सुनील शिंदे, जेठ महेंद्र शिंदे, जोगिंदर सुनील शिंदे, चुलत जेठ बापू विक्रम शिंदे यांनीसुध्दा शिवीगाळ करते माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलीस ठाणे गाठत होत असलेल्या छळाबाबत तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे करीत आहेत.

Web Title: Harassment of a married woman for money by filling a suitcase