मुलांच्या पालनपोषणासाठी ५० हजारांची मागणी करत विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:24 IST2021-09-10T04:24:40+5:302021-09-10T04:24:40+5:30

जळगाव : तालुक्यातील भादली येथील माहेर असलेल्या विवाहितेचा माहेरहून ५० हजार रूपये आणावे यासाठी छळ करणार्या पतीसह सासू व ...

Harassment of a married woman demanding Rs 50,000 for child rearing | मुलांच्या पालनपोषणासाठी ५० हजारांची मागणी करत विवाहितेचा छळ

मुलांच्या पालनपोषणासाठी ५० हजारांची मागणी करत विवाहितेचा छळ

जळगाव : तालुक्यातील भादली येथील माहेर असलेल्या विवाहितेचा माहेरहून ५० हजार रूपये आणावे यासाठी छळ करणार्या पतीसह सासू व सासरे या तीन जणांविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील भादली बुद्रुक येथील माहेर असलेल्या प्रतिमा रविंद्र पारधे यांचा विवाह भुसावळ तालुक्यातील साकरी येथील रविंद्र रामा पारधे यांच्याशी २१ जुन २०१२ रोजी झाला. लग्नानंतर एक महिना चांगला गेला. त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर मुलांचे पालन पोषण करण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावे यासाठी पती रविंद्र पारधे यांनी मारहाण केली. तर सासू आणि सासरे यांनी विवाहितेला आणि वडिलांना शिवीगाळ केली. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी भादली बुद्रुक येथे निघून आल्या. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन पतीसह सासू दगडाबाई रामा पारधे व सासरे रामा गणपत पारधे यांच्याविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Harassment of a married woman demanding Rs 50,000 for child rearing