मीराबाईच्या मदतीसाठी सरसावले हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:19 IST2021-08-15T04:19:00+5:302021-08-15T04:19:00+5:30
कजगाव, ता. भडगाव : मळगाव येथील आदिवासी समाजातील शेतकरी महिलेच्या तांदुळवाडी शिवारातील शेतातील अंदाजे दोन एकर कपाशी ...

मीराबाईच्या मदतीसाठी सरसावले हात
कजगाव, ता. भडगाव : मळगाव येथील आदिवासी समाजातील शेतकरी महिलेच्या तांदुळवाडी शिवारातील शेतातील अंदाजे दोन एकर कपाशी माथेफिरूने उपटून नासधूस केल्याचे वृत्त सर्वत्र पोहोचल्याने गरीब आदिवासी विधवा मोलमजुरी करणारी मीराबाई गायकवाड यांना मदत देणारे हात पुढे येऊ लागले आहेत.
जिल्ह्याचे सुपुत्र, सैनिक, माजी सैनिक, पोलीस दलातील जवानांनी १२ हजार ५०१ रुपये रोख व पैठणी साडी-चोळीची भेट मीराबाई यांना दिली. याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक दल, सीमेवर लढणारे जवान, पोलीस दलातील जवान तांदुळवाडीचे सरपंच सीताराम पवार, पोलीस पाटील किरण बागुल, तंटामुक्ती समिती अध्यक्ष जयवंतराव पाटील, सिद्धार्थ बागुल, उपसरपंच सूर्यकांत पाटील, बाप्पू नाईक, मुरलीधर खैरनार, प्रल्हाद पवार, ज्येष्ठ नागरिक व तरुण उपस्थित होते.