प्रति त्र्यंबकेश्वर चौंडेश्वरला शिवभक्तांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:38+5:302021-08-23T04:20:38+5:30

वाकोद, ता. जामनेर : मराठवाडा-खान्देश सीमेवर वाघूर नदीच्या तीरावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले चौंडेश्वर महादेव मंदिर प्रति त्र्यंबकेश्वर म्हणून नावारूपाला ...

A handful of Shiva devotees to Trimbakeshwar Choundeshwar | प्रति त्र्यंबकेश्वर चौंडेश्वरला शिवभक्तांची मांदियाळी

प्रति त्र्यंबकेश्वर चौंडेश्वरला शिवभक्तांची मांदियाळी

वाकोद, ता. जामनेर : मराठवाडा-खान्देश सीमेवर वाघूर नदीच्या तीरावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले चौंडेश्वर महादेव मंदिर प्रति त्र्यंबकेश्वर म्हणून नावारूपाला आले आहे. नवसाला पावणारे अशी ख्याती असलेल्या या जागृत देवस्थानावर श्रावण सोमवारनिमित्त शिवभक्तांची मोठी गर्दी होत असते.

जळगाव, औरंगाबाद, जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून नवस फेडण्यासाठी असंख्य भाविक श्रावण मास तसेच शिवरात्रीला येथे येतात व श्रद्धावत भोजन देऊन नवस फेडतात. येथे भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावण मासात येथे यात्रेचे स्वरूप आलेले असते.

प्रति त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे होणारे विविध विधी या ठिकाणीदेखील होतात, असे पुरोहित यांचे म्हणणे आहे. शास्त्रानुसार यासाठी नदी व नाल्याचा संगम, शिवाचे स्थान व बाजूला स्मशानभूमी असणे आवश्यक आहे. हे सर्व त्र्यंबकेश्वर पाठोपाठ चौंडेश्वर येथेदेखील असल्याने येथे नारायण नागबली, त्रिपिंडी व इतर विधी येथे होऊ शकतात, असे पुरोहित सांगतात. इतकेच नव्हे अनेकांनी येथे हा विधी केला आहे.

वाकोद येथील माजी जि. प. सदस्य शिवाजीराव देशमुख यांचे वडील नामदेवराव देशमुख यांनी येथील मंदिराची उभारणी केली आहे.

रामदास बाबाचे मोठे योगदान :

चौंडेश्वर महादेव मंदिराचे निष्ठावान पुजारी म्हणून शेवटपर्यंत रामदास बाबा यांनी येथे काम पाहिले होते. या परिसरातच त्यांनी महादेवाचे आणखी एक मंदिर तसेच हनुमान मंदिर, एक धर्मशाळा उभारली आहे. बाबांचे मोठे योगदान असून त्यांनी या ठिकाणी भक्ती व पूजा करून आपले संपूर्ण आयुष्य घालविले असल्याने त्यांच्या निधनानंतर या मंदिर परिसरात त्यांची समाधीदेखील बांधण्यात आली आहे.

सध्या श्रावण मास, विशेषत: सोमवारी येथे मोठी गर्दी होत असते. येथे भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात. श्रावण मासात याठिकाणी छोटी मोठी दुकाने थाटलेली असतात. नवसाला पावणारे चौंडेश्वर मंदिर म्हणून सर्वत्र ख्याती निर्माण या ठिकाणाची झालेली आहे.

220821\20170728_085148.jpg

फोटो : अर्पण लोढा वाकोद

Web Title: A handful of Shiva devotees to Trimbakeshwar Choundeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.