शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिका हाताने लिहिण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 13:27 IST

सागर दुबेउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी-पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी युनायटेड नेशनच्या पेपरला चक्क चुकीची प्रश्नपत्रिका दिल्यामुळे उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे निघाले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने काही वेळातच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या़ मात्र प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्य चकीत झाले. चक्क हाताने लिहीलेली ...

सागर दुबेउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी-पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी युनायटेड नेशनच्या पेपरला चक्क चुकीची प्रश्नपत्रिका दिल्यामुळे उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे निघाले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने काही वेळातच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या़ मात्र प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्य चकीत झाले. चक्क हाताने लिहीलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाली़ हाताने प्रश्नपत्रिका लिहिण्याची वेळ येणे हे उमविकडून अपेक्षीत नाही़ दरम्यान, चुकीची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कारवाईची अभाविपने मागणी केली होती़ त्यावर देखील काही हालचाली अद्याप सुरू झालेल्या नाहीत़ विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने लक्ष देण्याची गरज आहे़प्रश्नपत्रिका चुकीची असल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसाय झाली़ निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे पाचोरा, जामनेर तसेच जवळपास गावातील होती़ त्यामुळे रात्री साडेसात वाजता पेपर सुटल्यावर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी गाडी मिळणे मुश्किल झाले होते़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती़ आता अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरू होणार आहेत़ त्यासाठी विद्यापीठ प्रशासन कसे नियोजन आखणार याकडे सर्वांचे लक्ष आहे़ सूर्य आग ओकत असताना काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना उकाड्यात बसून पेपर सोडवावे लागत आहे़ विद्यार्थी हितासाठी विद्यापीठाने महाविद्यालांमधील सुविधांची पाहणी सुध्दा करण्याची गरज आहे़दुसरीकडे विद्यापीठ आवारातील मुला-मुलींच्या वसतिगृहाची पाहणी केल्यानंतर समस्या सिनेट सदस्यांकडे विद्यार्थ्यांनी मांडल्या़ त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना पाणी व विजेची समस्या असल्याचे समोर आले़ याबाबत सिनेट सदस्य कुलगुरूंची चर्चा करणार आहे़ मात्र, विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी सुविधा पुरविण्यात कमी पडत असल्याचे चित्र यातून दिसून येते़ आता यावर विद्यापीठ काय दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी चांगले अभ्यासक्रम व उपक्रम राबविण्यात येत असतात़ परंतू, किरकोळ चुकांमुळे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते़

टॅग्स :educationशैक्षणिकJalgaonजळगाव