भाजपाच्या बैठकीत नगरसेवकांची हमरीतुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:23 IST2021-02-23T04:23:47+5:302021-02-23T04:23:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- मनपातील सत्ताधारी भाजपच्या रविवारी पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत गटनेते भगत बालाणी व महिला व बालकल्याण ...

Hamritumari of corporators in BJP meeting | भाजपाच्या बैठकीत नगरसेवकांची हमरीतुमरी

भाजपाच्या बैठकीत नगरसेवकांची हमरीतुमरी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव- मनपातील सत्ताधारी भाजपच्या रविवारी पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत गटनेते भगत बालाणी व महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे यांचे पती भरत कोळी यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. या दरम्यान दोन्ही पदाधिकारी एकमेकांना भिडले असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

२४ रोजी भाजप कडून होणाऱ्या जेलभरो आंदोलनाबाबत रविवारी भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर भारती सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी हे देखील उपस्थित होते. या बैठकीत गटनेते भगत बालाणी यांनी भ रत कोळी यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे कोळी यांनी बालाणी यांच्याशी वाद घातल्या ची माहिती सूत्रांनी दिली आहे. किरकोळ शाब्दिक वादावरून हा वाद वाढत गेला. यामध्ये दोन्ही पदाधिकारी एकमेकांना भिडले. बैठकीतच वाद वाढत असल्याने जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी मध्यस्थी करून हा वाद शांत केला . दरम्यान याबाबत भगत बालाणी यांना विचारले असता त्यांनी आपण या बैठकीत उपस्थित नसल्याची माहिती लोकमतला दिली. तर भरत कोळी यांनी किरकोळ स्वरूपात हा वाद झाल्याची माहिती लोकमतला दिली.

Web Title: Hamritumari of corporators in BJP meeting