अनधिकृत दुकानांवर हातोडा

By Admin | Updated: January 11, 2017 00:34 IST2017-01-11T00:34:31+5:302017-01-11T00:34:31+5:30

अतिक्रमण निमरूलन विभागाच्या पथकाने रझा चौकातील प्लॉट नं.3 मधील अनधिकृत बांधकाम मंगळवारी कारवाई करीत तोडले.

Hammer at unauthorized shops | अनधिकृत दुकानांवर हातोडा

अनधिकृत दुकानांवर हातोडा


जळगाव: मनपा अतिक्रमण निमरूलन विभागाच्या पथकाने रझा चौकातील प्लॉट नं.3 मधील अनधिकृत बांधकाम मंगळवारी कारवाई करीत तोडले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती.
मेहरूणमधील संतोषी माता मंदिर परिसरातील रझा चौकात प्लॉट नं.3च्या मार्जीन स्पेसमध्ये समीनाबी शेख अय्युब खाटीक यांनी केलेल्या चार दुकानांच्या अनधिकृत बांधकामाबाबत मनपाकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यावर नगररचना विभागाकडे सुनावणीही घेण्यात आली होती.
त्यानंतर नगररचना विभागाने हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे सकारण आदेश दिले होते. त्यानुसार अतिक्रमण अधीक्षक एच.एम. खान यांच्यासह अतिक्रमण विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी या ठिकाणी जाऊन हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केली.
आतील इमारतीला धक्का लागू नये म्हणून जेसीबी न वापरता हातोडा, घणचा वापर करून हे बांधकाम तोडण्यात आले. दुपारी 4 वाजेर्पयत ही कारवाई चालली.

Web Title: Hammer at unauthorized shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.