शनिपेठेत बोळीतील दुमजली घरावर हातोडा

By Admin | Updated: October 9, 2015 00:23 IST2015-10-09T00:23:13+5:302015-10-09T00:23:13+5:30

जळगाव : शनिपेठेत लहान बोळीत अतिक्रमण विभागाने गुरूवारी पोलीस बंदोबस्तात कारवाई करीत एका घराचे बांधकाम तोडले.

Hammer at the double house in Shanipet | शनिपेठेत बोळीतील दुमजली घरावर हातोडा

शनिपेठेत बोळीतील दुमजली घरावर हातोडा

जळगाव : शनिपेठेत लहान बोळीत अनधिकृतपणे बांधकाम करून बांधलेली तीन दुमजली घरे तोडण्याचे आदेश नगररचना सहायक संचालकांनी दिले आहेत. त्यानुसार अतिक्रमण विभागाने गुरूवारी पोलीस बंदोबस्तात कारवाई करीत एका घराचे बांधकाम तोडले. उर्वरीत दोन घरांचे बांधकाम तोडण्याची कारवाई शुक्रवारी करण्यात येणार आहे. दरम्यान या कारवाईप्रसंगी विरोध झाल्याने वाद झाला होता. मात्र पोलीस बंदोबस्त असल्याने कारवाई झाली.

शनिपेठेतील पोलीस चौकीजवळील बोळीत अनधिकृतपणे बांधकाम करून तीन दुमजली घरे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे बोळ वापरासाठी बंद झाली होती. त्याबाबत नौशादबी सलीम खान यांनी नगररचना विभागाकडे 2011 मध्ये तक्रार केली होती. त्यावर नगररचना विभागाने हे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र संबंधीतांनी न्यायालयात धाव घेतल्याने कारवाई रखडली होती. मात्र न्यायालयाने दावा फेटाळल्याने नगररचना सहायक संचालकांनी हे अतिक्रमण तोडण्याचे सकारण आदेश दिले. त्यानुसार नगररचनातील शाखा अभियंता प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाने गुरूवारी या अतिक्रमणावर कारवाई केली. सुरूवातीला अतिक्रमणधारकांकडून विरोध झाला. मात्र 1 पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी, महिला पोलीस असा बंदोबस्त असल्याने कारवाई रेटून नेण्यात आली.

या पथकाने आधी वरच्या मजल्यावरील भिंत तोडून कारवाई सुरू केली. बोळीचा भाग मोकळा करण्याचे काम सुरू आहे. उर्वरीत दोन घरांवर देखील शुक्रवारी कारवाई केली जाणार आहे. दरम्यान या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Hammer at the double house in Shanipet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.