आरोपी पळाल्याने 'आधे इधर, आधे उधर'

By Admin | Updated: July 3, 2014 14:43 IST2014-07-03T14:43:14+5:302014-07-03T14:43:14+5:30

जिल्हा न्यायालयात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी योगेश उर्फ रिंकू शिवाजी पाटील हा पसार झाला. सुमारे अर्धा तास शोध घेत पोलिसांनी त्यास पुन्हा जेरबंद केले.

Halfway through half of the accused; | आरोपी पळाल्याने 'आधे इधर, आधे उधर'

आरोपी पळाल्याने 'आधे इधर, आधे उधर'

 

पसार झालेल्या युवकाने फोडला घाम : तिघा पोलिसांवरचे संकटाचे ढग दूर
जळगाव : जिल्हा न्यायालयात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी योगेश उर्फ रिंकू शिवाजी पाटील हा पसार झाला. सुमारे अर्धा तास शोध घेत पोलिसांनी त्यास पुन्हा जेरबंद केले. बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालय व परिसरात हे सिनेस्टाईल नाट्य रंगले अन् एका जुन्या इमारतीच्या गच्चीवर आरोपी सापडल्याने तिन्ही पोलिसांच्या वर्दीवर येणारे गंडांतर टळले. 
मोटारसायकलीच्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या योगेश उर्फ रिंकू शिवाजी पाटील (वय २३ रा.गोराडखेडा ता.पाचोरा) आणि शरद निंबा चौधरी (वय २६, बाहेरपुरा पाचोरा) या दोघांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी सुरेश पाटील, सुभाष शिंपी, रफीक काझी यांनी कोर्टात आणले होते. कोर्ट कॅण्टीनकडील मोकळ्या जागेतून आरोपी योगेश उत्तरेकडील प्रवेशद्वाराने पळत सुटला. काही क्षणात भानावर आल्यावर पोलीसही त्याच्यामागे धावत सुटले. त्याला पकडल्यावर पोलिसांनी खरोखरचा नि:श्‍वास टाकला. 
रिक्षाने जिल्हा रुग्णालयात नेले.
पळापळीत व काटेरी झुडपात शिरल्याने त्याच्या पायाला किरकोळ खरचटल्याच्या जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर उपचार करून त्याला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याबाबत रात्री जिल्हापेठ पोलिसांनी जुजबी माहिती दिली. योगेशविरुद्ध पळून जाण्याचा प्रयत्न वगैरे असा काही गुन्हा नोंदवलेला नव्हता.
--------
आरोपी प्रवेशद्वाराजवळून डावीकडे वळला. डॉ.पी.एन. पाटील यांच्या दवाखान्याकडून उजवीकडे वळत सरळ पुढे मोकळ्या जागेकडे तो वळला..तेथे काटेरी झाडेझुडपे होती..त्यातून मार्ग काढत, संरक्षक भिंतीवरून उडी मारत त्याने बाजूच्या एका जुन्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर गच्चीकडे कूच केले..तोपर्यंत ही धावाधाव पाहिल्याने लोकही जमू लागले होते..अखेर पोलिसांनी त्याची गचांडी पकडत ताब्यात घेतले आणि सुटकेचा नि:श्‍वास टाकला..सुमारे अर्धा तास हा प्रकार चालला..

Web Title: Halfway through half of the accused;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.