जळगाव : माल वाहतुकदारांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम आता हळूहळू वाढत असून बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली. सोबतच उत्तर भारतातून येणाºया सफरचंदाचीही आवक थांबली असून धान्य बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे.मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या संपामुळे बाजार समितीमधून बाहेर जाणारा माल पूर्णपणे थांबून हा माल येथे पडून आहे. त्यात आता संपाच्या सहाव्या दिवशी भाजीपाल्याच्या आवकवरही परिणाम झाला.केवळ ९०० क्विंटल भाजीपाला व फळांची आवकपाच दिवस जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून भाजीपाला येत असल्याने आवकवर परिणाम नव्हता. मात्र आता वाहतूकदारांच्या संपात हालचालींनी वेग घेतल्याने त्या-त्या परिसरातील वाहनधारक आपले वाहने बाहेर काढण्यास तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक रोखली जात आहे. या दिवसात एरव्ही दररोज सरासरी १७०० ते १८०० क्विंटल मालाची आवक असलेल्या जळगाव बाजार समितीमध्ये बुधवारी केवळ ९०० क्विंटल भाजीपाला व फळांची आवक झाली.
जळगावात भाजीपाल्याची आवक निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 21:31 IST
माल वाहतुकदारांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम आता हळूहळू वाढत असून बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली.
जळगावात भाजीपाल्याची आवक निम्म्यावर
ठळक मुद्देवाहतूकदारांच्या संपाचा परिणामउत्तर भारतातून येणाऱ्या सफरचंदाची आवक थांबली९०० क्विंटल भाजीपाल्याची आवक