बहुजन कर्मचारी संघाचे अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:09+5:302021-09-22T04:20:09+5:30
जळगाव : जिल्हा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि प्रोटॉनतर्फे विविध मागण्यांसाठी अर्धनग्न होऊन आंदोलन करण्यात आले आहे. ...

बहुजन कर्मचारी संघाचे अर्धनग्न आंदोलन
जळगाव : जिल्हा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि प्रोटॉनतर्फे विविध मागण्यांसाठी अर्धनग्न होऊन आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदनदेखील देण्यात आले.
या निवेदनात शिक्षणाच्या खासगीकरणाचा विरोध करण्यात आला आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. नवीन शैक्षणिक धोरण हे बहुजन विरोधी असल्याने ते रद्द करण्यात यावे, यासह विविध १७ मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर नरवाडे, प्रोटॉनचे जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव, सुमित्र अहिरे, सुरेश ठाकूर, गणेश काकडे, मुबारक शाह, मिलिंद निकम, दिनकर पाटील, आर. बी. परदेशी, प्रशांत लवंगे, महेंद्रकुमार तायडे, सुनील पाटील, विलास पाटील, आनंद जाधव, राजेंद्र बावस्कर, जितेंद्र रायसिंग, सुरेश भिल, आनंदा बागुल, प्रा.डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. निखिल तायडे, प्रकाश इंगळे, विलास चिकणे, अशोक सोनवणे, रमेश बाऱ्हे, अनिल त्रिभुवन, आनंद शिंदे उपस्थित होते.