अलवाडी शिवारात बिबटय़ाने पाडला हरणाचा फडशा
By Admin | Updated: April 10, 2017 17:14 IST2017-04-10T17:14:15+5:302017-04-10T17:14:15+5:30
अलवाडी रोडवरील कैलास शिवाजी पाटील यांच्या शेतात 9 रोजी रात्री 9 च्या सुमारास बिबटय़ाने हल्ला करून हरणाचा फडशा पाडून शेतातील कुत्र्याला जखमी केले.

अलवाडी शिवारात बिबटय़ाने पाडला हरणाचा फडशा
सायगाव ता. चाळीसगाव,दि.10- जवळ असलेल्या अलवाडी रोडवरील कैलास शिवाजी पाटील यांच्या शेतात 9 रोजी रात्री 9 च्या सुमारास बिबटय़ाने हल्ला करून हरणाचा फडशा पाडून शेतातील कुत्र्याला जखमी केले.
गेल्या अनेक दिवसांपासून नांद्रे काकडणे, अलवाडी परीसरात बिबटय़ाचा संचार सुरू असून लोक भयभीत झाले आहेत. अगोदर एक बिबटय़ा असावा असा संशय होता. मात्र ही संख्या दोन ते तीन असावी असे सांगितले जात आहे. वनविभागाने याची त्वरीत दखल घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.