जळगाव शहरात नावालाच हगणदरीमुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST2020-12-03T04:29:07+5:302020-12-03T04:29:07+5:30
जळगाव शहर महानगरपालिकेला हगणदरीमुक्ती साठी ओडीएफ प्लस चा दर्जा मिळाला असला तरी प्रत्यक्षात मात्र शहरातील अनेक भागात नागरिक अजूनही ...

जळगाव शहरात नावालाच हगणदरीमुक्ती
जळगाव शहर महानगरपालिकेला हगणदरीमुक्ती साठी ओडीएफ प्लस चा दर्जा मिळाला असला तरी प्रत्यक्षात मात्र शहरातील अनेक भागात नागरिक अजूनही उघड्यावरच शौचास जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात स्वच्छ भारत अभियानातंर्गत जाहीर करण्यात आलेल्या स्टार रेटिंग स्पर्धेत जळगाव शहराला तीन स्टार मिळाले. मात्र, कचऱ्याची समस्या कायम असून, शहरातील जमा होणाऱ्या कचऱ्यावर देखील कुठलीही प्रक्रिया होत नसल्याचेच पहायला मिळत आहे.