सादरे कुटुंबीयांच्या आरोपाने हादरले पोलीस दल

By Admin | Updated: October 18, 2015 00:43 IST2015-10-18T00:43:15+5:302015-10-18T00:43:15+5:30

सादरे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनी पोलीस दल हादरले. नाशिक येथे झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

The Hadalele police force was accused of Sadar family | सादरे कुटुंबीयांच्या आरोपाने हादरले पोलीस दल

सादरे कुटुंबीयांच्या आरोपाने हादरले पोलीस दल

जळगाव : रामानंद नगरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येनंतर शनिवारी सकाळी सादरे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनी पोलीस दल कमालीचे हादरले. नाशिक येथे पंचवटी पोलीस स्टेशन समोर झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या घडामोडींमुळे शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालय सुन्न झाले होते.

सादरे यांनी शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिकमधील निवासस्थानी आत्महत्या केल्याचे समजताच जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. त्यातच सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस दलातील अनेक अधिकारी तणावाखाली आले. या चिठ्ठीत त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ.सुपेकर, पोलीस निरीक्षक रायते व वाळू व्यावसायिक सागर चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आत्महत्येस जबाबदार असलेल्या डॉ.सुपेकर, रायते व चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे शनिवारी सकाळी वातावरण अधिकच तापले होते.

अधिकारी तणावात

जिल्हा पोलीस दलात शनिवारी सकाळपासून सादरे प्रकरणावरच चर्चा होत होती. गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.सुपेकर व निरीक्षक रायते कमालीचे अस्वस्थ झाले होते. डॉ.सुपेकर सकाळी अकरा वाजता कार्यालयात आले. दुपारी तीन वाजेर्पयत ते कार्यालयात होते. तर रायते हे संध्याकाळी उशिरार्पयत कार्यालयात दैनंदिन कामात होते.

 

महिनाभरापूर्वीच दिली आत्महत्येची खबर

पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी महिनाभरापूर्वी जिल्हा नियंत्रण कक्षास निनावी फोनद्वारे त्यांच्या स्वत:च्या आत्महत्येविषयी अफवा पसरविली होती. त्यानंतर ते दोन दिवस अज्ञातवासात गेले होते. दरम्यान, आपण आत्महत्या केली तर त्याचे काय पडसाद उमटू शकतात याची चाचपणीही त्यांनी केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. खंडपीठाच्या सुनावणीच्या दोन दिवस आधी सादरे यांनी हा प्रकार केला होता.

9 ऑक्टोबरला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

9 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सादरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अपिल करण्याचा पर्याय होता. मात्र त्या दरम्यान त्यांच्या अटकेच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यामुळे सादरेंनी स्वत:हून शरण येणे किंवा तपासाधिका:यांनी त्यांना अटक करणे हे पर्याय होते. या आठवडय़ात सादरे यांच्यावर अटकेची कारवाई होणार होती, त्याची माहिती मिळाल्याने ते अधिक तणावात होते, अशी चर्चा चपोलीस दलात आज होती.

बडतर्फीचा होता प्रस्ताव

सादरे यांना सेवेतून बडतर्फी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यासाठी त्यांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी नोटीसही बजावली होती. ही नोटीस घेऊन एक कर्मचारी सादरे यांच्या घरी नाशिक येथे गेला होता. निलंबनामुळे सादरे यांना जळगाव हे मुख्यालय दिले होते. मात्र त्यांनी जळगावऐवजी नाशिकलाच थांबणे पसंत केले.

Web Title: The Hadalele police force was accused of Sadar family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.