ममुराबाद येथे गटारीतील गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:14 IST2021-04-12T04:14:38+5:302021-04-12T04:14:38+5:30

लोकमत इफेक्ट लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : गावात तुंबलेल्या गटारीतील गाळ काढण्याचे काम थांबल्यानंतर, त्याकडे लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकमत’ने ...

Gutter sludge at Mamurabad | ममुराबाद येथे गटारीतील गाळ

ममुराबाद येथे गटारीतील गाळ

लोकमत इफेक्ट

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : गावात तुंबलेल्या गटारीतील गाळ काढण्याचे काम थांबल्यानंतर, त्याकडे लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकमत’ने नुकतेच प्रसिद्ध केले. त्याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने पुन्हा गाळ काढण्यास सुरुवात केली असून, ग्रामस्थांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

नियमितपणे सफाई होत नसल्याने, गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या लहान व मोठ्या गटारी काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गटारींची संपूर्ण स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्या संदर्भात सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर, ग्रामपंचायतीने रोजंदारी मजुरांच्या माध्यमातून गटारींमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याचे दिसून आले. सांडपाण्याच्या गटारींची समस्या त्यामुळे काहीअंशी सुटली असून, डासांच्या उत्पत्तीला लगाम बसत आहे.

फोटो-

ममुराबाद येथे ‘लोकमत’च्या वृत्तानंतर पुन्हा गटारीतील गाळ काढण्याच्या कामास गती देण्यात आली आहे. (जितेंद्र पाटील)

Web Title: Gutter sludge at Mamurabad