गुटखा खाणाऱ्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:17 IST2021-07-27T04:17:38+5:302021-07-27T04:17:38+5:30

रस्त्याची दुरवस्था जळगाव : सेंट लॉरेन्स शाळे समोरील रस्त्यावर चिखल व खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था ...

Gutkha eater headaches | गुटखा खाणाऱ्यांची डोकेदुखी

गुटखा खाणाऱ्यांची डोकेदुखी

रस्त्याची दुरवस्था

जळगाव : सेंट लॉरेन्स शाळे समोरील रस्त्यावर चिखल व खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शाळेत जाणेही विद्यार्थी व पालकांना कठीण होत असून या रस्त्याकडे महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. हा संपूर्ण रस्ता अत्यंत भयावह स्थितीत असून याठिकाणी अपघाताचीही शक्यता आहे.

सर्व्हेक्षण सुरू

जळगाव : जिल्ह्यातील कुपोषीत बालकांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिल्यानंतर महिला व बालकल्याण विभागाकडून या सर्व्हेक्षणाला सुरूवात करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात याबाबतची आकडेवारी समोर येणार असल्याची माहिती आहे.

पार्किंगमध्ये वाद

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड यंत्रणा नियमीत सुरू झाल्यानंतर वाहनांची वर्दळ वाढली आहे. यात वाहनतळावर वाहने लावल्यावरून सुरक्षा रक्षक व वाहनधारकांमध्ये वाद उद्भवत आहेत. यात सोमवारी एका रुग्णवाहिका चालक तसेच दुचाकी चालकांमध्ये किरकोळ वाद झाला होता.

चाळीसगावात सर्वाधिक रुग्ण

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातच सर्वाधिक ३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून या तालुक्यात पुन्हा रुग्ण समोर येत आहेत. मध्यंतरी याच तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. त्या मानाने चोपडा व जळगावात मात्र रुग्ण कमी असून जळगावात सद्या १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Gutkha eater headaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.