अमळनेर येथे २३ लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:13 IST2019-07-24T00:13:25+5:302019-07-24T00:13:50+5:30
अमळनेर : शनिपेठ, ताडेपुरा भागात मंगळवारी सकाळी छापा टाकून २३ लाख रुपयांचा गुटखा वाहून नेणारा ट्रक ताब्यात घेऊन चालकासह ...

अमळनेर येथे २३ लाखांचा गुटखा पकडला
अमळनेर : शनिपेठ, ताडेपुरा भागात मंगळवारी सकाळी छापा टाकून २३ लाख रुपयांचा गुटखा वाहून नेणारा ट्रक ताब्यात घेऊन चालकासह क्लिनरला अटक करण्यात आली.
पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व उपनिरीक्षक आर.जी.माळी यांना शहरात शनीपेठ भागात ट्रकभर गुटखा आला असल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वत: व पोलीस नाईक मिलींद भामरे, ईश्वर सोनवणे, संजय पाटील, शरद पाटील, किशोर पाटील, मधुकर पाटील, सुनील पाटील, योगेश महाजन यांना घेऊन शहरात चोपडा रोडवर शनी मंदिराजवळील रस्त्यावर अमळनेर शहराकडे जाणारे एक वाहन थांबविले असता वाहन चालक समर्थ कौशल जटाशंकर कौशल (२१) व रोहीत तिवारी (२१) रा.होळी चौक, महू, इंदूर यांना अटक करण्यात आली.