जिन्सी सांबरपाट महादेव मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:47+5:302021-07-24T04:12:47+5:30

रावेर : सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील जिन्सी सांबरपाट येथील श्री उमामहेश्वर महादेव मंदिरात श्री उमामहेश्वर सुस्वरूप श्री ...

Gurupournima celebration at Jinsi Sambarpat Mahadev Temple | जिन्सी सांबरपाट महादेव मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

जिन्सी सांबरपाट महादेव मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

रावेर : सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील जिन्सी सांबरपाट येथील श्री उमामहेश्वर महादेव मंदिरात श्री उमामहेश्वर सुस्वरूप श्री महंत १००८ स्वामी नवरतनगिरी महाराज यांच्या समाधीस्थळी कोरोनाचे निर्बंध पाळून हरिओम भक्त परिवाराकडून गुरुपौर्णिमेचा महोत्सव भावभक्तीने साजरा करण्यात आला.

श्री उमामहेश्वर महादेव मंदिरातील गादिपती स्वामी गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्री १००८ महंत स्वामी नवरतनगिरी महाराज यांचे मनोहारी मूर्तीचा महाभिषेक व षोडशोपचाराने महापूजा करण्यात आली. दरम्यान, सकाळपासून हरिओम भक्त परिवाराने महंत श्री १००८ स्वामी नवरतनगिरी महाराज यांच्या समाधीस्थळावरील श्रीच्या मूर्तीचे तथा श्री स्वामी गणेशगिरी महाराज यांचे चरणस्पर्श करून शिष्यपरिवाराने दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी महंत श्री १००८ स्वामी चंद्रगिरी महाराज आवर्जून उपस्थित होते. श्री स्वामी मनोजगिरी महाराज, स्वामी श्री हरिहरगिरी महाराज, श्री स्वामी परमानंद गिरी महाराज, श्री स्वामी सत्यमगिरी महाराज, श्री स्वामी गिरीजागिरी महाराज, राजू महाराज व शिवभक्त परिवाराने अथक परिश्रम घेतले.

Web Title: Gurupournima celebration at Jinsi Sambarpat Mahadev Temple