लाडकूबाई विद्यामंदिर भडगाव येथे गुरू पौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:14 IST2021-07-25T04:14:34+5:302021-07-25T04:14:34+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन करून झाले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील यांना ...

Guru Pournima at Ladkubai Vidyamandir Bhadgaon | लाडकूबाई विद्यामंदिर भडगाव येथे गुरू पौर्णिमा

लाडकूबाई विद्यामंदिर भडगाव येथे गुरू पौर्णिमा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन करून झाले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील यांना पत्रकार संघामार्फत पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे स्वागत व सत्कार उपप्राचार्य ए. एस. पाटील यांनी केला. प्राचार्या वैशाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर इयत्ता दहावीमध्ये विद्यालयात

प्रथम दिशा अमोल पाटील,

द्वितीय नुष्का योगेश शिंपी

तृतीय, चेतन गुलाबराव नेरपगार,

चतुर्थ तेजस सुदाम करकाळ,

पाचवा रोहित योगराज मांडोळे,

पाचवा दिनेश राजेंद्र सोनवणे या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर गुरू पौर्णिमेनिमित्त सौम्य सूर्यवंशी, दृष्टी पाटील, दिशा पाटील, पालक योगेश शिंपी, सुदाम करकाळ, दीपमाला यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गुरू पौर्णिमेनिमित्त सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर गुरू पौर्णिमेच्या पर्वावर प्रतापराव पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

सूत्रसंचालन व्ही. ए. पाटील व दीपक भोसले यांनी केले. आभार व्ही. ए. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशालेय समिती सदस्य अविनाश भदाणे, मंजूषा बागल, जागृती शिसोदे, ए. ए. पाटील यांचे सहकार्य लाभले.

कॅप्शन

भडगाव येथे लाडकूबाई विद्यालयात वृक्षारोपण करताना संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील व उपस्थित शिक्षक कर्मचारी.

Web Title: Guru Pournima at Ladkubai Vidyamandir Bhadgaon