झोपडीत सापडली गावठी बंदूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 13:15 IST2017-07-31T13:13:37+5:302017-07-31T13:15:20+5:30

आरोपीस अटक : परिसरात खळबळ

A gun in the hut | झोपडीत सापडली गावठी बंदूक

झोपडीत सापडली गावठी बंदूक

ठळक मुद्देयावल तालुक्यातील घटनापोलिसांना मिळाली गोपनीय माहितीपरिसरात खळबळ

ऑनलाईन लोकमत

यावल, जळगाव, दि. 31 - तालुक्यातील अभय  अरण्यातील वनखंड क्र . 109  मधील सुकळी-सामरी पाडा येथे राहत  असलेला चंद्र्िरसंग चमा:या पावरा याच्या झोपडीत  15 हजार रुपये किमतीची  गावठी बंदूक  आढळून  आली. ही बंदूक पोलिसांनी  जप्त केली आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. फैजपूर  उपविभागीय पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पो. नि. डी.के. परदेशी व फौजदार मनोहर मोरे यांच्या नेतृत्वाखाली  युनूस तडवी, यमन सुरळकर, संजीव चौधरी,  महम्मद तडवी,  हरिदास पाटील  यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Web Title: A gun in the hut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.