तीन महिन्यांपासून गुजरात, मध्य प्रदेशची बससेवा बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:57+5:302021-06-26T04:12:57+5:30
खासगी ट्रॅव्हल्स मात्र सुरू : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : देशासह राज्यातदेखील मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य ...

तीन महिन्यांपासून गुजरात, मध्य प्रदेशची बससेवा बंदच
खासगी ट्रॅव्हल्स मात्र सुरू :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : देशासह राज्यातदेखील मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून काही निर्बंध घालण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यामुळे एप्रिल महिन्यापासून गुजरात व मध्य प्रदेशमधून येणारी वाहतूक जिल्हा प्रशासनाने बंद केली होती. तर गुजरात व मध्य प्रदेश सरकारनेदेखील महाराष्ट्रातून येणारी प्रवासी वाहतूक बंद केली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी परराज्यात वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अद्यापही सुरू झालेल्या नाहीत.
मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून गुजरात व मध्य प्रदेशकडे जाणारी खासगी वाहतूक सुरू झाली असून, एसटीच्या फेऱ्या सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून आदेश मिळाल्यानंतरच एसटीच्या फेऱ्या सुरू होतील, अशी माहिती जळगाव विभाग नियंत्रकांनी दिली आहे. आता इतर राज्यांत व जिल्ह्यातदेखील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने आठवडाभरात पुन्हा बससेवा सुरू होण्याची शक्यता आहे.