एका तासात ११४९ फोटो अपलोडची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:21+5:302021-09-05T04:21:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ११२ देशातील ९०० अधिक चित्रकारांनी एका तासात ११४९ चित्र साकारून फेसबुकवर अपलोड करून 'गिनिज ...

एका तासात ११४९ फोटो अपलोडची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ११२ देशातील ९०० अधिक चित्रकारांनी एका तासात ११४९ चित्र साकारून फेसबुकवर अपलोड करून 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' कायम केले आहे. यात मानव सेवा विद्यालयातील उपशिक्षक सुनील दाभाडे यांनीही सहभाग नोंदविला होता. त्यामुळे त्यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली असून त्यांना सहभागाचे प्रमाणपत्र व सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
इंदौर येथील रडार संस्थेने फेसबुकच्या माध्यमातून जगभरातील विविध कलाकारांना एकत्रित आणून एका तासात चित्र रेखाटून ते फेसबुकवर अपलोड करण्याचे नियोजन केले होते. यापूर्वी एका तासात ७९७ चित्र फेसबुकवर अपलोड करण्याचा रेकॉर्डची नोंद आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पुन्हा रडार संस्थेच्या माध्यमातून ११२ देशातील ९०० कलाकारांनी तासाभरात ११४९ चित्र साकारून ते फेसबुकवर अपलोड केले. यामध्ये मानव सेवा विद्यालयातील सुनील दाभाडे यांनीही विश्वशांती विषयावर चित्र साकारून ते अपलोड केले. याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली असून त्यांना प्रमाणपत्र व सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.
शाळेतर्फे दाभाडेंचा सत्कार
दरम्यान, शनिवारी मानव सेवा विद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष आऱ एस़ डाकलिया यांच्याहस्ते गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून प्राप्त प्रमाणपत्र व सुवर्णपदक सुनील दाभाडे यांनी देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव विश्वनाथ जोशी, कोषाध्यक्ष घेवरचंद राका, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, बालमंदिर मुख्याध्यापिका मुक्ता पाटील आदींची उपस्थिती होती.