क्षयरोगमुक्त अभियान अंतर्गत यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, क्षयरोग विभागातील नरेद्र तायडे साकळी येथील डॉ. सागर पाटील, डॉ. स्वाती कवडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली मनवेल येथे क्षयरोग आजार हद्दपार करणे, पोषण आहार व मातृत्ववंदन योजना याविषयी मार्गदर्शन आशा स्वयंसेविका रंजना कोळी, पूनम पाटील, ज्योती मोरे यांनी केले.
सरपंच जयसिंग सोनवणे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बबन पाटील, अंगणवाडी सेविका कल्पना पाटील, प्रमिलाबाई कोळी उपस्थित होते.
क्षयरोग या आजारावर विविध प्रकारचे पोस्टर व रागोळ्यांद्वारे जनजागृती करण्यात आली. महर्षी वाल्मीक बालगणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
भालोद येथे गणरायाला निरोप
भालोद, ता. यावल : येथील गणेश मंडळांनी लाडक्या गणरायाला मोठ्या उत्साहात व कोरोना नियम पाळून निरोप दिला. विसर्जन कार्यक्रमात एकूण अकरा सार्वजनिक मंडळांनी शांततेत विसर्जन केले. मिरवणुकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी व गणेशभक्त सहभागी झाले होते. भालोदचे सरपंच प्रदीप श्रीराम कोळी यांनी सहकार्य केले. यामध्ये ओम गणेश मंडळ, नवतरुण गणेश मित्रमंडळ उत्साही गणेश मंडळ, जय शिवराय गणेश मंडळ, सातपुडा गणेश मंडळ, सर्वधर्मसमभाव गणेश मंडळ, संभाजी गणेश मंडळ, एकता गणेश मंडळ, अमर गणेश मंडळ, मोरया गणेश मंडळ व इंदिरानगर गणेश मंडळ या मंडळांचा विसर्जन मिरवणुकीत सहभाग होता. वाजंत्रीचा वापर न करता शांततेत व मोठ्या उत्साहात विसर्जन पार पडले. फैजपूर पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. जे. शेख पो. कॉ. महेश वंजारी, किरण चाटे, विनोद चौधरी, पोलीस पाटील लक्ष्मण पाटील, होमगार्ड प्लाटून अधिकारी सुनील क्षत्रिय ब्रिजलाल तायडे, चंद्रकांत लोखंडे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
भालोद येथील उत्साही गणेश मंडळाने शाडूमातीच्या श्रींची स्थापना करून भांड्यात विसर्जन केले. (नितीन झांबरे)