भडगाव महाविद्यालयात ‘सायबर सिक्युरिटी’वर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 23:33 IST2019-09-22T23:32:58+5:302019-09-22T23:33:02+5:30
भडगाव : येथील रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्विक हील फाउंडेशनतर्फे ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर मार्गदर्शनपर ...

भडगाव महाविद्यालयात ‘सायबर सिक्युरिटी’वर मार्गदर्शन
भडगाव : येथील रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्विक हील फाउंडेशनतर्फे ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला.
राष्ट्रीय सेवा योजना व वाणिज्य विभाग आयोजित कार्यक्रमात पर्यावरण प्रशाला व अर्थ सायन्स विभागाचे केतन सूर्यवंशी व धनराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एन.एन.गायकवाड होते. उपप्राचार्य प्रा.एस.आर.पाटील यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.जी.शेलार यांनी केले. सूत्रसंचालन साहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.ए.कोळी यांनी तर आभारप्रदर्शन वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सचिन हडोळतीकर यांनी केले.