२४ महिला सरपंचांना पंतप्रधान करणार मार्गदर्शन
By Admin | Updated: March 5, 2017 00:09 IST2017-03-05T00:09:39+5:302017-03-05T00:09:39+5:30
जिल्हाभरातील २४ महिला सरपंच येत्या ८ रोजी गांधीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिला सबलीकरण, स्वच्छता उपक्रम व ग्रामविकास यासंबंधीचे भाषण ऐकण्याची संधी मिळणार आहे.

२४ महिला सरपंचांना पंतप्रधान करणार मार्गदर्शन
जळगाव : जिल्हाभरातील विविध गावांच्या २४ महिला सरपंच किंवा ग्रा.पं.च्या पदाधिकाºयांना येत्या ८ रोजी गांधीनगर (गुजरात) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिला सबलीकरण, स्वच्छता उपक्रम व ग्रामविकास यासंबंधीचे मार्गदर्शनपर भाषण ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी महिला पदाधिकारी ५ रोजी सायंकाळी ७ वाजता जि.प.च्या परिसरातून एका खाजगी प्रवासी बसने रवाना होणार आहेत.
गांधीनगर येथील महात्मा गांधी मंदिर येथे ६ ते ८ मार्च यादरम्यान कार्यक्रम होणार आहेत. महिला मेळावा तेथे होत असून, त्यासाठी देशभरातील ा निवडक महिला सरपंच किंवा ग्रा.पं.च्या पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात ८ रोजी पंतप्रधान मोदी हे भाषण करतील.
या महिला सरपंच होणार सहभागी
अंकिता पाटील (लोणसीम), मीना पाटील (लोण खुर्द), मृदुला कुलकर्णी (रिंगणगाव), माधुरी पाटील (खडकेसीम), आरजू तडवी (न्हावी प्र.या.), शीतल राकेश धोबी (सुलवाडी), लता राणे (रोझोदे), प्रतिभा सुरवाडे (नांदवेल), आशा तायडे (नरवेल), रमाबाई सुरवाडे (वरणगाव), निता इंगळे (हतनूर), साधना कोळी (हतनूर), कोकिळाबाई पाटील (करंजी), रेखा बोरसे (शेलवड), चंदना पाटील (लोणपीराचे), भारती बाविस्कर (भट्टगाव), विजया पाटील (अडावद), मंगलाबाई पाटील (निमगव्हाण), भाग्यश्री गुर्जर (वर्डी), किर्ती पाटील (धानोरा प्र.अ.), प्रतिभा पाटील (जारगाव), उर्मिला पाटील (डोकलखेडा), उषाबाई पाटील (बोरखेडा), विमल कोळी (भोलाणे).