शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Gudi Padwa 2018 : जळगावात गुढीपाडव्याला होणार २५० गृहप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:06 IST

बाजारपेठेत चैतन्य

ठळक मुद्देश्रीखंडाला वाढली मागणीआॅफरमुळे ग्राहक आकर्षित

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १७ - गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत असून पाडव्याच्या दिवशी ९०० दुचाकी, २५० चारचाकींची विक्री होणार असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे. या सोबतच जवळपास २५० गृहप्रवेश होणार असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.५५० दुचाकींचे बुकिंगमुहूर्त साधण्यासाठी नोकरवर्गाकडून दुचाकी व चारचाकीची खरेदीसाठी बुकिंग करण्यात आली आहे. शहरातील एकाच दालनात गुढीपाडव्यासाठी ५५० दुचाकींचे बुकिंग झाले असून सर्वच वाहनांची डिलिव्हरी तयार असल्याचे सांगण्यात आले. शहरात एकूण ९०० दुचाकींची विक्री अपेक्षित आहे. शनिवारीदेखील रात्रीपर्यंत गर्दी कायम होती.२५० चारचाकींची विक्री अपेक्षितदुचाकीसोबतच चारचाकी वाहनांची विक्रीदेखील तेजीत आहे. व्यापारी, व्यावसायिक व नोकरदार यांच्याकडून चारचाकीच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. शहरातील एकाच शोरुममध्ये शनिवारपर्यंत ३५० चारचाकी वाहनांची बुकिंग करण्यात आले. त्या पैकी १५० वाहनांची डिलिव्हरी तयार असल्याचे सांगण्यात आले. इतर शो रुममध्येही चांगली बुकिंग असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे २५० चारचाकींची विक्री रविवारी होणार आहे.घर खरेदीत उत्साहरिअल इस्टेट क्षेत्रात उत्साह वाढला असून घर खरेदीकडे शहरवासीयांचा कल वाढला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात घरांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आले असून रविवारी २५० गृह प्रवेश होण्याचा अंदाज आहे. नोटाबंदीनंतर असलेली मंदी आता दूर झाल्याचे चित्र असून नवीन वर्षात चांगली उलाढाल राहण्याचा अंदाज बांधकाम व्यावसायिकांनी वर्तविला आहे. घरांची खरेदी व बुकिंग जोरात सुरू असून नागरिकांकडून वेगवेगळ््या साईटची पाहणी केली जात आहे. बँकांचे व्याजदर कमी झाल्याने त्याचा फायदा घेत जात असल्याचे सांगितले जात आहे.एसीला सर्वाधिक मागणीइलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारालादेखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. यंदा एसीला सर्वाधिक मागणी असून एलईडी, फ्रीज, वॉशिंगमशीन यांच्या खरेदी व बुकिंगसाठी दोन दिवसांपासूनच गर्दी होत आहे. यामध्ये अनेकांनी शनिवारीदेखील वस्तूंची खरेदी केली.आॅफरमुळे ग्राहक आकर्षितग्राहकांनी दुचाकी खरेदी करावी यासाठी वाहन कंपन्यांनी आकर्षक आॅफर दिल्या आहेत. त्यात वाहनांच्या खरेदीसाठी व्याजदरात सूट, विमा अशा आॅफर दिल्या जात आहे. तर इलेक्ट्रॉनिक बाजारात होम थिएटर यासह दैनंदिन वापरातील वस्तू मोफत असल्याने ग्राहक आकर्षित होत आहे.घर खरेदीमध्ये यंदा उत्साह असून गुढीपाडव्यासाठी बुकिंगला चांगला प्रतिसाद राहिला. यामध्ये अनेकजण गृहप्रवेशदेखील करतील.सुमीत मुथा, बांधकाम व्यावसायिक.घरांच्या बुकिंगसाठी चांगला प्रतिसाद आहे. पाडव्याला अनेक जण खरेदी करतील तर काही गृह प्रवेश करतील.- श्रीकांत खटोड, बांधकाम व्यावसायिक.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकींचे ३५० वाहनांचे बुकिंग झाले असून १५० वाहनांची डिलिव्हरी दिली जाणार आहे.- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापकदुचाकी खरेदीसाठी मोठा उत्साह असून आमच्याकडे ५५० दुचाकींचे बुकिंग झाले असून सर्व हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे.- अमित तिवारी, महाव्यवस्थापक.

टॅग्स :JalgaonजळगावGudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८