गुढीपाडवा उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 14:22 IST2019-04-06T14:22:03+5:302019-04-06T14:22:35+5:30

‘पाडवा पहाटसह विविध कार्यक्रम उत्साहात

Gudi Padwa celebrates with enthusiasm | गुढीपाडवा उत्साहात साजरा

गुढीपाडवा उत्साहात साजरा


जळगाव : मराठी नववर्षदिन तथा गुढीपाडवा शहर आणि जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव येथील संस्कार भारतीच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त पाडवा पहाट कार्यक्रम शनिवारी सकाळी महात्मा गांधी उद्यानात झाला. यात वेगवेगळी गाणी सादर करण्यात आली. याचबरोबर शहरातील अनेक भागात रा.स्व.संघाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. तसेच विविध संघटनांतर्फे नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. जिल्ह्यातही विविध ठिकाणी असेच कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली.

Web Title: Gudi Padwa celebrates with enthusiasm