राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्र्यांचे गुप्तगु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST2021-06-24T04:13:35+5:302021-06-24T04:13:35+5:30
या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याचे कळते. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील हे धरणगावला ...

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्र्यांचे गुप्तगु
या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याचे कळते.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील हे धरणगावला आले होते. कार्यक्रमस्थळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकाऱ्यांपैकी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, रवींद्र पाटील, एन.डी.पाटील, डॉ. विलास पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी असलेल्या एका कार्यालयाच्या खोलीत या सर्वांमध्ये साधारण १० ते १५ मिनिट चर्चा झाली या चर्चेत शासकीय कमिटी, विविध विकास कामांबाबत चर्चा झाली. यावेळी पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना हक्काने कामे सांगा निश्चित केले जातील, असे आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर आपण महिन्यातून एकदा एकत्र बसत चर्चा करत जाऊ, असे पालकमंत्र्यांनी सांगितल्याचे कळते.