सावित्रीच्या कर्तबगार लेकींच्या पाठीवर पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:38+5:302021-07-29T04:16:38+5:30
धरणगाव येथे शिवसेनेतर्फे विकासकामांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. यात दहावीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात आपापल्या विद्यालयातून पहिल्या आलेल्या विद्यार्थिनींचा शाल-श्रीफळ ...

सावित्रीच्या कर्तबगार लेकींच्या पाठीवर पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप!
धरणगाव येथे शिवसेनेतर्फे विकासकामांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. यात दहावीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात आपापल्या विद्यालयातून पहिल्या आलेल्या विद्यार्थिनींचा शाल-श्रीफळ आणि पाच हजार रुपये रोख देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये प. रा. विद्यालयाची साक्षी रमेश काटवे, बालकवी विद्यालयाची पूजा विजय पाटील, इंदिरा कन्या विद्यालयाची दिव्या जनार्दन चव्हाण, अँग्लो उर्दू विद्यालयाची अंजुमन काझी, महात्मा फुले विद्यालयाची दीपाली दिलीप नेरकर या विद्यार्थिनींचा समावेश होता. याच कार्यक्रमात युवासेना युवती तालुकाप्रमुख स्नेहा प्रकाश पाटील हिचादेखील सत्कार करण्यात आला.
दरम्यान, महात्मा फुले विद्यालयाची दीपाली दिलीप नेरकर या विद्यार्थिनीचे आई-वडील ही दोन वर्षांची असतानाच मयत झाले असून, तिच्या दिव्यांग मावशीने मोलमजुरी करून तिला वाढविले. तिने जिद्दीने अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत तब्बल ९४.२० टक्के मिळवून पहिला क्रमांक पटकावला. तिचा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तिच्या यशाचे कौतुक करत तिला पंचवीस हजार रुपये रोख इतकी रक्कम दिली.
याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, तालुकाप्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, आघाडी जिल्हा संघटक महानंदा पाटील, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, उषा वाघ, कल्पना कापडणे, जनाबाई पाटील, भारती चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपतालुकाप्रमुख राजेंद्र ठाकरे, मोतीआप्पा पाटील, भगवान महाजन, न. पा. गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, अहमद पठान, कीर्ती मराठे, अंजली विसावे, रत्ना धनगर, नौशाद शेख, विलास महाजन, विजय महाजन, जितेंद्र न्हायदे, भानुदास विसावे, ॲड. शरद माळी, योगेश वाघ, धीरेंद्र पुरभे, दिनेश येवले, प्रशांत वाणी, रुपेश अमृतकर, किशोरी वाणी, डी. जे पाटील, महेंद्र चौधरी, भरत महाजन, रवींद्र जाधव, युवा सेना शहरप्रमुख संतोष महाजन, जीवन बयस, विनोद बयस, संजय लोहार, बालू जाधव, छोटू जाधव, वाल्मिक पाटील, लक्ष्मण माळी, राहुल रोकडे, तौसिक पटेल, हेमंत चौधरी, विनोद रोकडे, विलास पवार, सतीश बोरसे, अरविंद चौधरी, गोलू चौधरी, गोपाल पाटील, अमोल चौधरी, गोपाल चौधरी, सुकलाल चौधरी, दगडू चौधरी, शेख कालू, खालिक शेख, असलम शेख, सद्दाम शेख, वसीम पिजारी, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख कमलेश बोरसे उपस्थित होते.
प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी केले तर आभार नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी मानले.
280721\img-20210728-wa0021.jpg~280721\28jal_6_28072021_12.jpg
सावित्रीच्या कर्तबगार लेकींच्या पाठीवर पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप !~सावित्रीच्या कर्तबगार लेकींच्या पाठीवर पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप !