पालकमंत्री आज जामनेरला नुकसानीची करणार पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST2021-09-10T04:22:48+5:302021-09-10T04:22:48+5:30
जामनेर : चक्रीवादळ व पावसामुळे घर व पिकांचे विविध ठिकाणी नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव ...

पालकमंत्री आज जामनेरला नुकसानीची करणार पाहणी
जामनेर : चक्रीवादळ व पावसामुळे घर व पिकांचे विविध ठिकाणी नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील शुक्रवारी सकाळी तालुक्यात येत आहे.
सकाळी ९ वा. ओझर बुद्रुक, ओझर खुर्द येथील घरांच्या व पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. साडेदहा वाजता तोंडापूर येथील पूरग्रस्तांशी भेट व नुकसानीची पाहणी करतील. हिंगणे नक, ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, रामपूर, लहासर, ढालसिंगी व जुनोने या गावांतील सुमारे १३० घरांचे नुकसान झाले. तळेगाव व पहूर येथील दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने व सुमारे ३० गावांतील कापूस, मका, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान वाकडी मंडळात झाले असून, महसूल विभागाकडून पंचनामे केले जात आहे.
चक्रीवादळाने एकट्या ओझर गावातील शंभरहून जास्त घरांवरील पत्रे उडाल्याने व पावसाच्या पाण्याने घरातील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाल्याने कुटुंब उघड्यावर पडली. शासनाने पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला सारीत शक्य ती तातडीची मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेतकरी खचले
नैसर्गिक आपत्तीने शेतकरी पुरता खचला असून दररोज राजकीय नेते पाहणी दौरा करीत आहे. सहानुभूती नको, प्रत्यक्ष मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे. चक्रीवादळाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळी व कापसाचे मोठे नुकसान झाले. यंदा हंगाम चांगला असल्याने सुखावलेल्या शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीने मारून टाकले आहे. शासनाने केवळ लागवडीचा खर्च दिला तरी पुरे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
090921\09jal_8_09092021_12.jpg~090921\09jal_9_09092021_12.jpg
ओझर (ता.जामनेर) येथील घरांचे व केळी पिकाचे झालेले नुकसान~ओझर (ता.जामनेर) येथील घरांचे व केळी पिकाचे झालेले नुकसान