पालकमंत्री भाजपात
By Admin | Updated: September 23, 2014 10:23 IST2014-09-23T10:23:45+5:302014-09-23T10:23:45+5:30
चोपड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगदीश वळवी हेसुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली. ते २३ रोजी प्रवेश करतील, असे मानले जात आहे.

पालकमंत्री भाजपात
>चोपडा : चोपड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगदीश वळवी हेसुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली. ते २३ रोजी प्रवेश करतील, असे मानले जात आहे. मेहुणे डॉ.विजयकुमार गावीत भाजपात गेल्याने वळवींचे तळ्यात-मळ्यात सुरु होते. संजय सावकारे हे २३ रोजी सकाळी महानगरी एक्स्प्रेसने भुसावळात येत आहेत. याच दिवशी भाजप कार्यकर्त्यांची बैठक होईल. २५ रोजी उमेदवारी अर्ज भरतील.
सावकारे यांच्या निवडणुकीच्या तोंडावरील भाजपा प्रवेशाने जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. पहिले पालकमंत्री गुलाबराव देवकर कारागृहात आणि दुसरे सावकारे भाजपात गेल्याने स्थानिक पातळीवर नेतृत्व उरलेले नाही.
भुसावळातील राष्ट्रवादीचे नेते संतोष चौधरी यांचे ते निकटवर्ती असल्यामुळे २00९ मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली होती. तथापि, नंतर दोघांमध्ये कमालीचे वितुष्ट आले. त्यातच खडसे यांनी सावकारे यांना भाजपामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. ते भुसावळमध्ये भाजपाचे उमेदवार असू शकतील. भाजपामध्ये प्रवेश करताना आज त्यांनी राज्यमंत्रीपदाचा, आमदारकीचा आणि राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपा-शिवसेना युतीमध्ये भुसावळची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला असताना सावकारे यांनी भाजपात जाणे पसंत केले. युती तुटणे नक्की झाल्याने भाजपाने त्यांना आपल्या तंबूत आणले आणि उद्या त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आज आहे. तत्पूर्वी सावकारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पक्षात पदे बदल, मेळावे होतात. आम्हाला विचारले जात नाही. तुम्ही म्हणता कामाला लागा, निवडणूक लढा हे कसे काय? यावर पवार यांनी याविषयीे काहीच माहीत नाही. माझा दोष नसल्याचे सांगितले.