जीएसटीचा पैसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST2021-06-24T04:13:50+5:302021-06-24T04:13:50+5:30
एरंडोल/ अमळनेर : पटोले यांची घणाघाती टीका लोकमत न्यूज नेटवर्क एरंडोल /अमळनेर : प्रत्येक वस्तूच्या विक्रीमूल्यावर ...

जीएसटीचा पैसा
एरंडोल/ अमळनेर : पटोले यांची घणाघाती टीका
लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडोल /अमळनेर : प्रत्येक वस्तूच्या विक्रीमूल्यावर लावला जाणारा अतिरिक्त कर अर्थात जीएसटी हा कुठे ५, १५ ते २५ पर्यंत सर्वसामान्य ग्राहकांकडून घेतला जातो. हा जीएसटी म्हणजे तुमच्या-आमच्याकडून कररूपाने घेतला गेलेला अतिरिक्त
पैसा उद्योगपतींच्या घरात जात असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एरंडोल व अमळनेर येथे केली.
एरंडोल येथे म्हसावदनाक्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांशी बुधवारी रात्री साडेआठ वाजता संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पटोले यांचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन व इतर पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
यावेळी २० कोरोनायोद्धे,२ ओबीसी सेल अध्यक्ष व १ अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
बरोबरच तालुक्यातील कासोदा येथील काही मुस्लिम बांधवांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी मंचावर आमदार प्रणिती शिंदे, आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, शोभा बच्छाव, श्याम पांडे, अतुल लोंढे आदी उपस्थित होते.