शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

संचालकांच्या फोडाफोडी नाट्यानंतर ग.स.त हाणामारी; लोकसहकारच्या संचालकांना धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 10:41 IST

Jalgaon : सहकार गटाचे ११ संचालक मतदानासाठी ग.स.च्या समोर आले. तेव्हा त्यांच्या वाहनाला घेराव घालण्यात आला. त्यानंतर त्यांना गाडीतून उतरता आले नाही. अखेर पोलीस बंदोबस्तात हे सर्वजण मतदानासाठी हॉलमध्ये पोहोचले.

जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.च्या अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. यात उदय पाटील यांची अध्यक्ष म्हणून तर रवींद्र सोनवणे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. मात्र त्या आधी लोकसहकार गटातून सहकार गटाकडे आलेल्या रवींद्र सोनवणे आणि ज्ञानेश्वर सोनवणे यांना धक्काबुक्की करण्यात आली. सहकार गटाचे ११ संचालक मतदानासाठी ग.स.च्या समोर आले. तेव्हा त्यांच्या वाहनाला घेराव घालण्यात आला. त्यानंतर त्यांना गाडीतून उतरता आले नाही. अखेर पोलीस बंदोबस्तात हे सर्वजण मतदानासाठी हॉलमध्ये पोहोचले. हॉलमध्येसुद्धा रवींद्र सोनवणे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून ग.स.च्या अध्यक्षपदासाठी हाय व्होल्टेज ड्रामा सुरु होता. ग.स.निवडणुकीत ९ संचालक सहकार गटाचे, प्रगतीचे ६ आणि लोक सहकारचे ६ जण निवडून आले होते. या त्रिशंकू परिस्थितीमुळे ग.स.च्या अध्यक्षपदासाठी अनेकांनी तयारी केली होती. त्यात लोक सहकार गटाकडून निवडून आलेले रवींद्र सोनवणे आणि ज्ञानेश्वर सोनवणे यांनी सहकार गटाला पाठिंबा दिला.

आमच्यावर हल्ला झाला - उदय पाटीलअध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ग.स.मध्ये येत असतानाच आमच्यावर हल्ला झाला. तसेच जवळपास १५ मिनिटे वरच्या मजल्यावर येता आले नाही. त्यात गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. अखेर पोलीस बंदोबस्तातच वर यावे लागले. १०० वर्षाच्या इतिहासात या संस्थेला हा डाग लागला आहे. लोकसहकार गटाचे पॅनल प्रमुख मनोज पाटील आणि दिलीप चांगरे यांच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केला, असा आरोप नवनिर्वाचित अध्यक्ष उदय पाटील यांनी केला.अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलतांना उदय पाटील म्हणाले की, मी आणि इतर संचालक यांच्या जीविताला धोका आहे. आमच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्हाला बराच वेळ गाडीत डांबले. ज्या सभासदांनी निवडून दिले हा त्या सभासदांचा अपमान आहे. आता पोलिसांनीच आम्हाला संरक्षण द्यावे आणि घरी सोडावे. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे. तसेच मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न होता. सुशिक्षित, उच्चपदस्थ अधिकारी आणि शिक्षक असलेल्या या संचालकांनीच हे काम केले आहे. त्यामुळे संस्थेची प्रतिमा मलीन झाली, असेही उदय पाटील यांनी सांगितले.

असा दिला सहकारला पाठिंबानवनिर्वाचित उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी सांगितले की, लोक सहकार गटाचे सहा संचालक निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत कुणासोबत जायचे यावर सहा पैकी पाच संचालकांनी सहकार गटासोबत जाण्यास उत्सुकता दाखवली होती. त्या पाच संचालकांमध्ये रवींद्र सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रतिभा सुर्वे, सुनील सूर्यवंशी, अनिल पाटील यांचा समावेश होता. फक्त एका संचालकांचा याला विरोध होता. मात्र आम्ही दोघांनी सहकार गटासोबतच जाण्याचा निर्णय घेतला. इतर तीन जणांनी त्यातून माघार घेतली.’

ज्ञानेश्वर सोनवणेंना सभागृहातच धमकी?सहकार गटाला पाठिंबा देणारे ज्ञानेश्वर सोनवणे यांना प्रतिभा सुर्वे आणि सुनील सूर्यवंशी यांनी सभागृहातच धमकी दिली, हा सर्व प्रकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर घडला, असा आरोप ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केला.

उदय पाटलांना अश्रू अनावरअध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना उदय पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. पाटील हे अध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र झालेल्या हल्ल्यामुळे आपण व्यथित झालो आहोत. तसेच आमच्या आणि कुटुंबाच्या जीविताला धोका आहे. पोलिसांनी संरक्षणात घरी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आम्ही सरकारी नोकर आहोत आणि ही नोकरी महत्त्वाची आहे. ग.स. हे काही आमचे पोट भरण्याचे साधन नाही, असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव