कार मागे घेतांना धक्का लागून वृध्देचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 12:39 IST2017-10-07T12:37:26+5:302017-10-07T12:39:48+5:30

कार मागे घेत असताना अंगणात थांबलेल्या इंदूबाई काशिनाथ सोनवणे (वय ६८) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मोहाडी, ता.जळगाव येथे शनिवारी सकाळी ९ वाजता घडली. इंदूबाई या दिवंगत जि.प.अध्यक्ष भिला गोटू सोनवणे व विद्यमान जि.प.चे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांच्या वहिणी होत्या.

Growth of old age after shaking the car | कार मागे घेतांना धक्का लागून वृध्देचा मृत्यू

कार मागे घेतांना धक्का लागून वृध्देचा मृत्यू

ठळक मुद्देमोहाडी येथील घटनामृत वृध्दा जि.प.समाजकल्याण सभापतींच्या वहिणीडोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू


आॅनलाईन लोकमत
जळााव दि,७:  कार मागे घेत असताना अंगणात थांबलेल्या इंदूबाई काशिनाथ सोनवणे (वय ६८) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मोहाडी, ता.जळगाव येथे शनिवारी सकाळी ९ वाजता घडली. इंदूबाई या दिवंगत जि.प.अध्यक्ष भिला गोटू सोनवणे व विद्यमान जि.प.चे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांच्या वहिणी होत्या.
इंदूबाई या प्रभाकर सोनवणे यांच्याकडेच वास्तव्याला होत्या. सकाळी त्या अंगणात बाहेर असताना चालकाने कार मागे घेतली असता धक्का लागून त्या जमिनीवर कोसळल्या. डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

यावेळी सभापती प्रभाकर सोनवणे, जि.प.सदस्य पवन भिला सोनवणे यांच्यासह दोन्ही परिवारातील लोकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात धाव घेतली. सहायक फौजदार भालचंद्र पाटील व बाळकृष्ण पाटील यांनी पंचनामा करुन शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या अपघातावरुन रुग्णालयात आरोप-प्रत्यारोप झाले. याप्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. प्राथमिक स्तरावर अकस्मात मृत्यूची नोंद करुन चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Growth of old age after shaking the car