भुसावळात 12 वधू-वरांचा सामुहिक विवाह सोहळा
By Admin | Updated: May 21, 2017 16:50 IST2017-05-21T16:50:39+5:302017-05-21T16:50:39+5:30
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळच्यावतीने झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात 12 वधू-वरांचा विवाह उत्साहात पार पडला.

भुसावळात 12 वधू-वरांचा सामुहिक विवाह सोहळा
भुसावळ,दि.21- तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळच्यावतीने झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात 12 वधू-वरांचा विवाह उत्साहात पार पडला. शहरातील जुना आरपीएफ बॅरेक येथे हा सोहळा झाला़
लगAविधी सुमंगल अहिरे व शैलेंद्र जाधव यांच्याहस्ते पार पडला. कार्यक्रमास समाजकल्याण अधिकारी यु.डी.राजपूत उपस्थित होत़े अंकुश हुसळे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक रमेश मकासरे होते. नगरसेवक रवी सपकाळे, राजु सूर्यवंशी, जगन सोनवणे, नगरसेवक रवींद्र खरात, रवींद्र भालेराव, विजय सुरवाडे, सुरेश भालेराव, सुरेश यशोदे, शरद सोनवणे, युवराज लोणारी, शांताराम जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती़ कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश तायडे, जयंत आढाळे, आनंद मोरे, कमलाकर तायडे होते.