विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थातर्फे महामानवाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:10 IST2020-12-07T04:10:29+5:302020-12-07T04:10:29+5:30
खुबचंद सागरमल विद्यालय जळगाव : येथील खुबचंद सागरमल विद्यालयात मुख्याध्यापक सतीश साळुंखे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. ...

विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थातर्फे महामानवाला अभिवादन
खुबचंद सागरमल विद्यालय
जळगाव : येथील खुबचंद सागरमल विद्यालयात मुख्याध्यापक सतीश साळुंखे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, मंगला सपकाळे, योगेंद्र पवार, भास्कर कोळी, विजय पवार, पकंज सूर्यवंशी, संजय पाटील, सुलेमान तडवी व हरित सेनेचे प्रमुख प्रवीण पाटील उपस्थित होते.
जिजामाता माध्यमिक विद्यालय
जिजामाता माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शिक्षक संजय खैरनार, कृष्णा महाले-दिनेश सोनवणे, विकास तायडे, संगीता पाटील, प्रशांत मडके उपस्थित होते.
अभाविप
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, महानगरमंत्री आदेश पाटील, जिल्हा संयोजक रितेश चौधरी, पवन भोई, संकेत सोनवणे, आकाश पाटील, जितेश चौधरी, जयेश माळी, चैतन्य जुनारे, नितेश चौधरी, मयूर अलकरी उपस्थित होते.