गंधार कला मंडळातर्फे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:22 IST2021-02-27T04:22:38+5:302021-02-27T04:22:38+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम ऑनलाईन करण्यात यात ...

गंधार कला मंडळातर्फे अभिवादन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे
औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम ऑनलाईन करण्यात यात जळगाव आणि बाहेरील कलाकार सहभागी झाले होते. नाशिक येथील प्राची कावळे यांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे गीत सादर केले. मुंबई येथील
प्राजक्ता कोल्हटकर यांनी जयोस्तुते जयोस्तुते हे सावरकरांचे गीत सादर
केले. जयंत ठोमरे यांनी प्रेम कुणावरही कराव, ही कुसुमाग्रजांची कविता सादर केीली. अनुजा मंजुळ यांनीही गीत सादर केले. नीता केसकर, श्रृती वैद्य यांनीही सहभाग नोंदवला. समारोपप्रसंगी अनिकेत मंजुळ यांनी मजसी ने परत मातृभूमीला हे गीत गायले. कार्यक्रमाचे निवेदन वरदा देशमुख यांनी केले. संकल्पना मानिनी
तपकिरे यांची होती तर लेखन विशाखा देशमुख यांनी केले आहे.