माजी पंतप्रधान राजीव गांधींना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:31+5:302021-08-21T04:21:31+5:30
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) तर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त ...

माजी पंतप्रधान राजीव गांधींना अभिवादन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) तर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाध्यक्ष जे. डी. भालेराव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समता जागृती संस्थेचे अध्यक्ष यशवंत घोडेस्वार, रिपाइंचे महानगराध्यक्ष सिद्धार्थ गव्हाणे, प्रवीण परदेशी, अजीज शेख, प्रकाश सोनवणे, दीपक बिऱ्हाडे, विजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जैन माध्यमिक विद्यालय
जळगाव : कै. मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयातर्फे राजीव गांधी यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक मोठ्या उपस्थित होते.
जिल्हा काँग्रेस कमिटी
जळगाव जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटीतर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माजी शहर अध्यक्ष डॉ. ए. जी. भंगाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी त्यांची जयंतीही सद्भावना दिन म्हणून देशभरात साजरी करण्यात येत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला शहर उपाध्यक्ष शाम तायडे, सेवादलचे शहर कार्याध्यक्ष महेंद्र सिंग पाटील, विजय वाणी, ज्ञानेश्वर कोळी, महेंद्र पाटील, जगदीश गाढे, नदीम काझी, शशी तायडे, नितीन पाटील, मनोज सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.